प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : निव्वळ प्रसिद्ध मिळावी यासाठी नेहमीच असे कृत्य माजी स्विकृत नगरसेवक श्री शशांक बावचकर करत असतात या प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांनी जाणिवपूर्वक माझ्या फोटो माझी बदनामी करणच्या हेतुने सोशल मीडियावर पोस्ट केला व प्रसार माध्यमांना दिला म्हणून मी त्यांच्या विरोधात तक्रार केली असता शशांक बावचकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
उमाकांत दाभोळे इचलकरंजीतील भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता आहेत 'मेरी मिट्टी, मेरा देश' या अभियानाच्या अमृतकलश वाहनामध्ये बसलेले माझ्यासह महिला सहकाऱ्यांचे काढलेले फोटो माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी सोशल मीडियावर टाकले. हा फोटो सोशल मीडियावर जाणीवपूर्वक टाकून बदनामी केल्याप्रकरणी शशांक मल्हारपंत बावचकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कलम ५०० नुसार या अदखलपात्र गुन्ह्याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
६ ऑक्टोबर २०२३ रोजी इचलकरंजी येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इचलकरंजी संपर्क दौ-यावर आले होते.यावेळी "मेरी मिट्टी मेरा देश अमृतकल या अभियाना अंतर्गत इचलकरंजी येथे संपर्क अभियानही करण्यात आले. यावेळी "मेरी मिट्टी मेरा देश अमृतकलश" वाहन रॅलीमध्ये मी अमृतकलश व्हॅनमध्ये या अभियानासाठी होतो. यावेळी माझ्यासह सहकारी व महीला सहकारी यांचे काढलेले फोटो शशांक वाचकर यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी सोशल मिडीयावर एका ग्रुपवर पोस्ट केली.
यातून जाणिवपूर्वक माझी राजकीय, सामाजिक बदनामी करण्यात आली आहे. शशांक बावचकर हे इचलकरंजी नगरपालिकेमध्ये कॉग्रेस पक्षाचे स्विकृत नगरसेवक होते. तसेच सद्या ते कॉंग्रेसचे प्रदेशसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे जाणिवपूर्वक मी सक्रीय भाजपा कार्यकर्ता असल्याने माझी इचलकरंजी शहरात असलेली राजकीय प्रतिमा खराब केली.तसेच मला मानसिक त्रास देण्याचा हेतूने बदनामी केली.याची मला परिपूर्ण खात्री झाली आहे. बावचकर यांची तक्रार महापालिकेच्या वाहनाबाबत होती. तर त्यांनी फक्त वाहनाचे फोटो काढून महानगरपालिकेमध्ये तक्रार करणे क्रमप्राप्त होते. तसे न करता बावचकर यांनी दृष्ट हेतूने माझा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहेत.
बावचकर यांनी माझी राजकीय व सामाजिक बदनामी करण्याच्या हेतूने जे फोटो ग्रुपवर प्रसिद्ध केले आहेत. त्याची चौकशी होवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी,यासाठी मी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी बावचकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.बावचकर यांच्यावर माझे सोशल मीडियावर बदनामीकारक फोटो टाकल्याचा ठपका ठेवत अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
या पुढे ही त्यांनी जर असे काही बदनामीचे प्रकार केल्यास पुढे हि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल