इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या 'स्वच्छता पंधरवडा ' उपक्रमा अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा ' या अनुषंगाने

 एक तारीख एक तास एक साथ ' या स्वच्छता मोहिमेला शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या 'स्वच्छता पंधरवडा ' उपक्रमा अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा ' या अनुषंगाने 'स्वच्छ भारत अभन अंतर्गत केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत स्वच्छता ही सेवा (SHS) स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतभर रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी एकाच वेळी नागरिकांच्या श्रमदानातून *एक तारीख एक तास एक साथ* या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर अभियानामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांच्या सहभागातून सामूहिक श्रमदानाव्दारे शहरातील विविध ६२ ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्याचा कार्यक्रम निश्चित केला होता. यामध्ये शहरवासीयांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असलेने शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी , तत्कालीन नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व माजी नगरसेवक - नगरसेविका , सर्व सामाजिक संघटना (NGO),  शासकीय कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी, सर्व बँका, वित्तीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी, सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, बचत गटाच्या महिला तसेच विविध महिला संघटना, कामगार संघटनाचे सदस्य, बिल्डर आणि आर्किटेक्ट असोशिएशन यांचे सदस्य, क्रीडा संस्था, तरुण मंडळाचे सदस्य  इत्यादी शहरातील सर्व घटकांना सहभागी होण्याचे आवाहन करणेत आले होते.              

  या मोहिमेचा प्रातिनिधिक स्वरूपाचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाशराव आवाडे, आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, माजी नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी तसेच सर्व माजी लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील  कॉ.के.एल.मलाबादे चौक येथे रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करणेत आला.

 शहरातील विविध ६२ ठिकाणी जवळपास ११००० नागरिकांच्या उपस्थितीत त्या प्रभागातील माजी नगरसेवक - नगरसेविका तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करणेत आला.

               याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक  सागर चाळके, शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने, नगरसेवक अब्राहम आवळे, रवी लोहार, भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले,दिलीप मुथा, शामसुंदर मर्दा, अनिल डाळ्या, उमाकांत दाभोळे, तसेच शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचत गटाच्या महिला प्रतिनिधी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी,जेष्ठ नागरिक संघटना प्रतिनिधी, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, एन.सी.सी.चे विद्यार्थी, खाजगी क्लासेसचे विद्यार्थी यांचेसह महानगर पालिकेचे सहा.आयुक्त केतन गुजर, वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती पाटील- खोत, कामगार अधिकारी विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, सुभाष देशपांडे, विद्युत अभियंता संदीप जाधव, संतोष पवार, सचिन पाटील आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

         सर्व शहरवासीयांनी  महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार या अभियानात शहरवासीयांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविल्याबद्दल सर्व उपस्थित शहरवासीयांचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून आभार व्यक्त करणेत येत आहे.



        

Post a Comment

Previous Post Next Post