पोलीस तात्पर्य.. घटनास्थळी ताबडतोप दाखल
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
देहूरोड दि ९, गांधी नगर जामा मस्जिद च्या पाठीमागील परिसरात रात्री उशिरा गाड्या फोडण्याचा प्रकार,अज्ञात गुंडांनी गाड्या फोडून पसार परिसरात मध्यरात्री १२ ;३० च्या सुमारास दहशत माजवण्याचा प्रयत्न करत अज्ञात गुंडांनी घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या.
या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेले आहेत, या प्रकारामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गरीब होतकरूंच्या गाड्या फोडून कोणाला काय साध्य होणार परिसरात अशी हळहळ व्यक्त केली जात आहे. महिला व लहान मुलांमध्ये भयचा वातावरण निर्माण झालेला आहे. पोलीस तात्पर्य दाखवत घटनास्थळी दाखल झाले, शहर पोलीस या घटनेला गांभीर्याने हाताळत आहे पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहे.