देहुरोड शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारणी जाहीर.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड : शहरातील प्रक्यात चौक अबूसेठ रोड येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नाम फलकाचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष कमलेश उकरंडे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि आज देहुरोड शहरात पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीचे शाखा सुरू होत आहेत त्यामुळे देहुरोड शहरात वंचितांना नक्की न्याय मिळणार आज पदाचे कार्यकारिणी जाहीर केल्याने देहुरोड शहराला नवसंजीवनी नक्की मिळणार आहे .
देहूरोड शहरात येत्या काळात वंचित बहुजन आघाडी नक्की निवडणूक लढवुन उमेदवार निवडून येतील असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. जिल्हाध्यक्षांनी
यावेळी शहर कार्यकारणी घोषित केले देहुरोड शहराध्यक्ष पदी विशाल चव्हाण, उपाध्यक्ष पदी राजकुमार पगारे, करीम भाई शेख ,खंडेराव गायकवाड, अमित पगारे, तर महासचिव पदी किरण क्षीरसागर सचिव पदी संतोष रोकडे तर संघटक पदी अशोक मोरे ,प्रताप राजपूत, ताहीर शेख, युनूस शेख, खजिनदार पदी राहुल वाळके, सह खजिनदार भरत इंगळे, कायदा सल्लागार पदी ॶॅड अशोक रूपवते संपर्क प्रमुख विकास कांबळे, सल्लागार पदी विश्वनाथ सरोदे , महीला आघाडी नसरीन शेख, युवा आघाडी आकाश आव्हाड, असे नवनिर्वाचित सदस्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन मला पद दिले आहे त्यानुसार मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी राजकीय व सामाजिक प्रश्नावर भर देणार आहे येत्या कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक देखील आम्ही लढवणार आहे तसेच लोकसभा व राज्यसभाचे देखील निवडणूक पक्षाच्या वतीने लढविण्यात येणार आहे व आम्ही ४८ जागा लढवणार आहे .
इंडिया आघाडी सोबत आपण जाणार की नाही असे पत्रकारांनी विचारले असता हे वरिष्ठांच्यावर अवलंबून आहे जर आंबेडकर साहेब यांची इंडिया आघाडी बरोबर युती झाले तर संपूर्ण देशभर आंबेडकर हे स्टार प्रचारक राहतील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांनी जिल्हा अध्यक्ष यांनी मला जे पद बहाल केले आहे माझ्यावर पक्षाने जे विश्वास दाखवले आहे त्याला तडा न जाऊ देता मी शहरात लोकांचे जे काही नागरिक प्रश्न आहे ते मी सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन व पक्ष मला जे काही आदेश देतील त्याचा मी पूर्णपणे पालन करीन तळागाळातील लोकांना पक्षाच्यावतीने प्रश्न सोडविन व सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीचे काम करीन व पक्ष बळकट करीन असे मनोगत व्यक्त केले. यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी आज देहूरोड शहरात वंचित बहुजन आघाडीचे नाम फलकाचे अनावरण व शहर कार्यकारणी जाहीर होत आहे हे आनंदाची बाब आहे या देशा मध्ये कुणाला गरज असेल तर ते बहुजनाची आहे वंचितांची खूप गरज आहे आदरणीय नेते दीन दुबळ्यांचे कैवारी व देशाचे मुल्क मैदानी तोफ एड. प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व चालले आहे आंबेडकर हे नाव अख्ख्या जगाच्या पाठीवर कोरलेला नाव आहे त्याला कोणी पुसू शकत नाही तर बाळासाहेब आंबेडकर यांचे नावाचे शाखा या देह रोड शहरांमध्ये होत आहे हे अभिमानाची गोष्ट आहे यावेळी धर्मपाल तंतरपाळे यांनी नुसते शाखा सुरू करून उपयोग नाही त्याच्या साठी कष्ट करावा लागणार आहे जिल्हाध्यक्ष तुमच्या पाठीशी आहेत देह रोड शहराचे जे काय प्रश्न असतील ते प्रश्न सुटले पाहिजे सर्वांनी एकजुटीने पक्षाचे काम करा असे शुभेच्छा मी तुम्हाला देतो असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले
यावेळी कार्यकारिणी जाहीर करताना वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे राहुल इनकर, घोसभाई सुनार, जेष्ठ नेते सिद्धार्थ चव्हाण, झाकीर सय्यद, जेष्ठ नेते रवींद्र चोपडे, संगीता (नानी) वाघमारे, सुरेश भालेराव, मधुकर रोकडे, इकबाल भाई (पेंटर) तसेच देहुरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस बी ढमाल, उपनिरीक्षक लखन कुमार वाव्हळ यावेळी उपस्थित होते.