प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
फिर्यादी नामे अभिजित अप्पासाहेब वानिरे रा. शिवाजीपेठ ता. करविले जिल्हा. कोल्हापूर ०४ अटक आरोपी पैकी आरोपी नं.०२ सोमेन सुधांशू मन्ना वय ३३ वर्षे रा. बालाभद्रपूर ता. कोंटाई जिल्हा पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल, याने फिर्यादी यांचे मोबाईलवर संपर्क साधून फिर्यादी यांची मुलगी मंजिरी अभिजित वानिरे हिला MBBS ला प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून सदर प्रवेश करिता ३२,५०,०००/- रुपये रोख रक्कमेची मागणी केली. फिर्यादी यांनी आरोपी यांच्यावर विश्वास ठेवून रक्कम दिनांक २७/०९/२०२३ रोजी आरोपी यांना अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल रखी किरण येथे ३२,५०,०००/- रुपये दिले. त्यानंतर अटक आरोपी हे फिर्यादी यांना दिलेला मोबाईल नंबर बंद करून पसार झाले. फिर्यादी यांचा आरोपी सोबत संपर्क होत नव्हता त्यामुळे फिर्यादी यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली त्यामुळे त्यांनी अलिबाग पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. २४७ / २०२३ भा. द. वि. कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे यांना आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनिरीक्षक / श्री. विशाल शिर्के, पोह/ अमोल हंबीर, पोह/ प्रतिक सावंत, पोना/सचिन वावेकर, पोशी / लांबोटे यांचे तपास पथक तयार केले. त्यामध्ये पोलिस उप निरीक्षक विशाल शिर्के व ०४ अंमलदार यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. सदर पथकाने सायबर पोलीस ठाणेचे पो. ना. तुषार घरत, पो.ना. अक्षय पाटील यांचे मदतीने डम्प डाटा व सीडीआर बाबत तांत्रिक विश्लेषणच्या आधारे आरोपीत हे हैद्राबाद मार्गे ओरिसा या दिशेने जात असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. सदर पथक हे वरिष्ठांच्या परवानगीने खाना झाले. सदर तपास पथक यांनी पाठलाग करून आरोपी यांना ते जात असलेल्या त्यांचे मूळगावी रा. बालाभद्रपूर ता. कोंटाई जिल्हा पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल येथे पोहचण्यापूर्वीच त्यांना दिघा पूर्व मेदिनीपुर पश्चीम बंगाल या ठिकाणावरून ते पळून जात असलेल्या वाहन महेंद्रा स्कॉर्पीओ सह शिताफीने ताब्यात घेतले.
सदर पथकाने ०७ आरोपी पैकी खालील ०४ आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
१) सौरभ सौम्य दास, वय - ४३ वर्षे रा. फ्लॅट नं. ३ ए, आसनमोल जिल्हा. वेस्ट बंगाल,
२) सोमेन सुधांशू मन्ना वय ३३ वर्षे रा. बालाभद्रपूर ता. कोंटाई जिल्हा पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल,
३) सोमेश बिरेन्द्र्नाथ बिरा वय २७ वर्षे रा. बेतालीया पोस्टदुर्मुत ता. मारीस्दा जिल्हा पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल,
४) अभिषेक कुमार दिलीप रज्जाक वय २२ वर्षे रा. जोगवाणी जिल्हा आरडीया राज्य बिहार, मूळ रा. बालाभद्रपूर ता. कटाई जिल्हा पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल
या ०४ आरोपी यांना दिनांक ०३/१०/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात् वापरलेली स्कॉर्पीओ वाहन किंमत ५,००,०००/- रुपये व फसवणूक केलेल्या रकमेपैकी २०,००,०००/- रोख रक्कम आणि आरोपी याने गुन्ह्यात वापरलेला रेडमी कंपनीचा ५००० /- रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २५,०५,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर ०४ आरोपी यांना मा. न्यायालयासमोर हजर करून दिनांक ०८/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदर आरोपी यांनी आणखी काही गुन्हे केलेत काय तसेच इतर ०३ पळून गेलेले साथीदार व फसवणूक केलेली उर्वरित रक्कम याबाबत पुढील तपास पोउपनि / विशाल शिर्के करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक विशाल शिर्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोह/ अमोल हंबीर, पोह / प्रतिक सावंत, पोना / सचिन वावेकर, पोशी / लांबोटे व सायबर पोलिस ठाणेचे तुषार घरत, अक्षय पाटील. यांनी या गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.