गांजा तस्करी प्रकरणी फरार असलेल्या युवकास अटक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर -गांजाची तस्करी करून कंळबा जेल मधील कैद्यांना गांजाचा पुरवठा करण्यात सहभागी असलेला मुख्य आरोपी रमेश दादासो शिंदे उर्फ परीट (रा.विक्रमनगर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे . 

या अगोदर त्याच्या साथीदारांना  कंळबा कारागृहात गांजाच्या पुड्या फेकताना दोघां जणांना पकडून त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गु न्हा दाखल करण्यात आला आहे.त्या पासून रमेश शिंदे फरार होता. तो शहरात लपून छपून वावरत होता.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला राजाराम तलाव येथे असल्याची माहिती मिळाली  असता त्याला अटक करण्यात आली या गुन्हयांचा तपास पोलिस निरीक्षक संदिप जाधव करीत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव व पोलिस अंमलदार महेश गवळी यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post