लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार ताब्यात.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर-चंदगड़ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस हवालदार राजीव शामराव जाधव (वय 44रा .गडहिग्लज).याला साडे चार हजारांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले आहे.ही कारवाई चंदगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

तक्रारदार इसमावर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.संबंधित इसमाला बोलावून गुन्हयात अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली.त्यात शेवटी साडे चार हजार रुपये देण्याचे ठरवले.त्या        नंतर तक्रारदारांने लाचलुचपत विभागाकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली.त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने पडताळणी करून पोलिस हवालदार राजीव शामराव जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post