प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यावधी रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरार असलेला ए.एस.ट्रेडर्सचा संचालक नामदेव पाटील याला गगनबावडा तालुक्यातिल खोकूर्ले येथे काल सकाळी कृती समितीच्या मदतीने आर्थिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
या अगोदर ए.एस.ट्रेडिगच्या म्होरक्यासह काही संचालकांना अटक केली आहे.नामदेव पाटील हा फरारी झाला होता.नामदेव पाटील हा टू व्हीलर दुरुस्तीचे काम करीत होता.पण ह्या ए.एस.ट्रेडिंग मध्ये संचालक झाल्या पासून काही दिवसातच कोट्याधिश झाला होता ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.