प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-क्लास वन जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रशेखर साखरे (रा.सांगली) यांना लाचलुचपतच्या पथकाने एक लाख दहा हजारांची लाच घेताना त्यांच्या कार्यालयात रंगेहाथ पकडून कारवाई केली.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार हे पुण्याचे असून ते वेगवेगळ्या सरकारी ऑफिसना आवश्यक असलेले साहीत्य पुरवठा करण्याचा ठेका घेतात.जिल्हा क्रिडा कार्यालयाने आवश्यक असलेले साहीत्याचे टेंडर काढले होते.या ठेकेदारांनी ऑनलाईन पध्दतीने टेंडर भरुन 8 लाख 89 हजार दोनशे रुपयांचे साहीत्य पुरविले होते.पण त्या विभागाने बिल काढ़ले नव्हते.ते बिल काढ़ण्यासाठी साखरे यांनी ठेकेदाराकडे 15 % प्रमाणे एक लाख 10 हजारांची लाचेची मागणी केली असता ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या पथकाने खातरजमा करून आज दुपारी जिल्हा क्रिडा कार्यालयात साखरे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई केली.साखरे यांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.