प्रेस मीडिया लाईव्ह :
अमर धांडे :
भोसरी : आज इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वतीने अर्थातच पोस्ट विभागाकडून ऑक्सफर्ड इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल भोसरी आळंदी देहू फाटा या ठिकाणी मोफत बाल आधार काढून देण्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
या वेळी या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजना, पोस्टाचा 396 मध्ये अपघात विमा, मुलांच्या शिक्षणासाठी सेविंग प्लॅन, आणि यासारख्या पोस्ट विभागाच्या अनेक प्रकारच्या बचत योजनांचा या ठिकाणी कॅम्प आयोजन केले होते . तरी पोस्ट पेमेंट बँकेचे कर्मचारी किरण सुरवसे, ज्ञानेश्वर बागलकर, रवींद्र शिंदे, बीसी विश्वंभर शिंदे, प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चे पत्रकार अमर धांडे या सर्व मंडळींनी विशेष परिश्रम घेऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वतीने कॅम्प आयोजित करून याच्या सर्व सुविधा जनतेपर्यंत राबवल्या गेल्या .