छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद प्रतिनिधी :
सुदृढ समाजासोबतच सशक्त राष्ट्रनिर्मितीचा ध्यास घेऊन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संगमनेर येथे २२ वर्षांपूर्वी लावलेल्या जयहिंद लोकचळवळ या रोपाचं रूपांतर आता राज्यस्तरीय वटवृक्षात होत आहे.*युवा आमदार सत्यजीत तांबे यांनी या संघटनेची धुरा हाती घेतली* असून राज्यभरातील तरुणांना एकत्र आणून संघटना बांधणीस त्यांनी सुरुवात केली आहे. राज्यभरातून दोन हजार पेक्षा अधिक तरुणांनी सभासद होण्यासाठी ऑनलाईन नोंदनी केली होती, त्या नंतर 30 सप्टें ते 2 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत झालेल्या जयहिंद च्या तीन दिवसीय जागतिक परिषदेसाठी निवडक ३०० तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला. उर्वरीत युवकांना संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका आयोजित करण्यात येत आहेत.
जयहिंद लोकचळवळ या संघटनेने आता राज्यभर विस्तार सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणुन *संघटनेची जिल्हास्तरीय बैठक जालना रोड येथील हॉटेल रेवेरा एक्झक्युटिव्ह येथे आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पार पडली.* जयहिंद मध्ये सामिल होण्यासाठी आधीच ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी केलेल्या व काही नवीन तरुण युवक युवतींनी आपला सहभाग नोंदविला.या वेळी *जयहिंद लोकचळवळीचे राज्य समन्वयक खालिद पठाण यांनी संघटनेची उद्दिष्टं, संघटनेतर्फे होणारे उपक्रम,त्या उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांकडून अपेक्षित सहभाग आदी गोष्टींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.* शिक्षण, आरोग्य, कृषि, क्रीडा, रोजगार व उद्योजकता विकास, पर्यावरण संवर्धन, महिला व युवक कल्याण,अशा विवीध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणी साठी जयहिंद लोकचळवळ एक उत्तम व्यासपीठ म्हणून समोर येत आहे.
बैठकीत मराठवाडा विभागीय समन्वयक राहुल संत हे देखील उपस्थित होते यांनी उपस्थित सभासदांच्या प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन केले. सदर बैठकीचे आयोजन जयहिंद चे जिल्हा समन्वयक ईश्वर तांबे,ॲड. क्षितिज रोडे, गौरव जैस्वाल,कमलेश कामिटे यांनी केले होते. प्रस्ताविक स्वप्नील खरात यांनी केले. दिक्षा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.