प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एकत्रित बैठक आयोजित करून मराठा आरक्षणासाठी उपोषण बसलेले मनोज जिरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी यांच्या समर्थनात आजी-माजी आमदार खासदार पदाधिकारी यांना गाव प्रवेश बंदी करून कॅन्डल मार्च काढण्यात आला.
कॅन्डल मार्च ची सुरुवात अतिग्रे येथील मुख्य चौक हनुमान मंदिर येथून सुरुवात करण्यात आला व गावामध्ये सर्व चौक गल्ली मध्ये कॅन्डल मार्च करण्यात आला एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय भवानी जिरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी अतिग्रे गावातील सकल मराठा समाज सर्व पुरुष महिला लहान मुले सर्वांच्या हातामध्ये कॅण्डल घेऊन काढण्यात आला