अतिग्रे येथे मोफत नेत्र तपासणी




प्रेस मीडिया लाईव्ह : 

 अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे : 

    अतिग्रे तालुका हातकणंगले येथे नॅब नेञ रुग्णालय मिरज यांच्या संयुक्ताने विनायक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांच्या सोयी करता रविवार दिनांक एक आक्टोंबर रोजी नेत्र तपासणी व निदान कार्यक्रम सादर करण्यात आला . 




 त्याचे प्रायोजक श्री सारंग प्रमोद पाटील व विनायक कुंडलिक पाटील यांनी केले यामध्ये अतिग्रे गावातील जवळपास 56 लोकांनी या कॅम्पचा लाभ घेतला त्या 56 लोकांना तपासणी करून त्यामधील वीस लोकांना ऑपरेशन साठी पाठवण्यात आले या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड,उपसरपंच सौ छाया पाटील, सदस्य भगवान पाटील, बाबासो पाटील ,सदस्या सौ कलावती गुरव, आरोग्य सेवक महेश वडर, भाजप शहर अध्यक्ष विश्वास पाटील, कृष्णात पाटील, सारंग पाटील , उत्तम पाटील़ ,प्रदीप पाटील ,विनायक पाटील ,उद्योजक संजय चौगुले ,राजवर्धन पाटील ,राम पाटील ,,व नागरिक उपस्थित होते

     

Post a Comment

Previous Post Next Post