प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर : स्वतंत्र मजदूर यूनियन महिला आघाडी कोल्हापूर व कृष्णा हॉस्पिटल, उचगावयांचे संयुक्त विद्यमाने भव्य महिला आरोग्य शिबीर, " *क्रांतीबा जोतीबा फुले ग्रंथालय, ताराबाई पार्क, कोल्हापूर* " येथे नुकतेच संपन्न झाले.
या शिबीरामध्ये डॉ. मिलींद सदावर्ते बालरोग तज्ञ व डॉ.ज्योती सदावर्ते स्त्रिरोग तज्ञ यांनी महिला रोग निदान व वंध्यत्व निवारण यावरती सखोल मार्गदर्शन केले.या शिबीरामध्ये मोफत नावनोंदणी व सल्ला मोफत HB तपासणी, टेस्ट ट्यूब बेबी/ IUI / IVF उपचारासंबंधी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन स्त्रियांच्या अनेक तक्रारीचे निवारण व उपचार, स्त्रियांच्या रजोनिवृत्ती संबंधी तक्रार निवारण व उपचार, PCOD संबंधी निवारण व उपचार, अत्याधुनिक कॉस्मेटिक स्त्रीरोग शास्त्र विषयी संपूर्ण माहिती देणेत आली. *स्वतंत्र मजदूर युनियन महिला आघाडी, कोल्हापूर* यांचेवतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून या महिला आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. हे शिबीर यशस्वी करणेसाठी स्वतंत्र मजदूर यूनियन, महिला आघाडी कोल्हापूर शाखेच्या जिल्हाध्यक्ष शिवलीला हिरेमठ, सचिव स्वाप्नगंधा मौर्य, सहसचिव प्रिती दिक्षांत, कोषाध्यक्ष प्राजक्ता कुरणे यांचेसह लता कांबळे, ज्योती चौगुले, स्वाती कांबळे, मनिषा भोसले, विशाखा कांबळे, गंगा कांबळे, कृष्णा हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या आरोग्य शिबीराचा अनेक महिलांनी लाभ घेतला. तसेच उपस्थित लहान मुलांच्याही विविध आरोग्य तपासण्या करणेत आल्या.
--------------------------------------------------------------
राष्ट्रपिता म गांधी.... जय जवान जय किसान... प्रणेते लालबहाद्दूर शास्त्री... यांची जयंती साजरी....
कोल्हापूर : विद्यापीठ सोसायटीचे तपोवन येथील सौ शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल मध्ये आज म गांधी आणि दुसरे पंतप्रधान लाबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या श्रद्धेने विविध उपक्रमांनी साजरी केली...
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मिनी कापसे आणि इतिहास शिक्षिका सौ.स्नेहल केसरकर मॅडम यांच्या हस्ते दोन्हीही युगपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सौ.स्नेहल केसरकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याविषयीचा समग्र इतिहास सांगून त्यांचा जीवन परिचय करून दिला... याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते....