प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
खालापूरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून डोलवली रेल्वे स्थानक परिसरात ७ दिवसांपूर्वी झालेल्या घरफोड्यांचे तपास सुरू असतांनाच गणेश विसर्जनाच्या रात्री वरद विनायकाच्या महड गावात ६ ठिकाणी घरफोड्या करून हजारो रुपयांचा ऐवज व रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी महड गावातील ३ ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या होत्या. त्याच पध्दतीने या घरफोड्या करण्यात आल्या आहेत. तर १५ दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीत पुन्हा त्याच घरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत ऐवज लंपास केला आहे. घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मधे केद झाले आहेत.
शुक्रवारी दि 27/9/2023 रोजी पहाटे चोरी घरफोडी , समिर मुरकुटे, संतोष राऊत , शिंदे, पंढरी पाटील. यांच्या घरी हि १५ दिवसांत दुसरी घटना आहे.यामधे हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला असून खालापूर पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. किती ऐवज लंपास झाला याचा पंचनामा केला जात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे