प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -आज शहरात पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्स्व आणि इद-मिलाद च्या पाश्वभुमीवर सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील चार ही पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी संचलन करून दंगल नियंत्रण पथकाने केलेली प्रात्यक्षिके लक्षणीय ठरली .
या संचलनाची सुरुवात बिंदु चौक,महाद्वार रोड ,पापाची तिकटी ,मिरजकर तिकटी ,बिनखांबी गणेश मंदीर ,शिवाजी पुतळा मार्गे संचलन करण्यात आले.यात पोलिस अधीक्षक श्री .महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अजित टिकेसो यांच्या उपस्थितीत पोलिस अधिकारी,पोलिस कर्मचारी यांच्यासह आरसीपी प्लाटूनची तुकडी सहभागी झाली होती.