देहूरोड शहर राष्ट्रवादी कार्यालय, माई बालभवन आणि धम्म सदन मध्ये पात्रे यांचा सन्मान करण्यात आला
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड दि. -: द जस्ट आज राष्ट्रीयवृत्त वाहिनीचे पुणे जिल्हा प्रतिनिधी व ह्यूमन राईट्स जस्टीस असोसिएशन या मानवतावादी संघटनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांनी वयाच्या साठव्या वर्षात पदार्पण केल्याने त्यांच्या देहू रोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात देहू रोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष दीपक चौगुले व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात केक कापून पात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच माई बालभवन मध्ये संचालक मधुकर इंगळे यांनी व दिव्यांगांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या व प्रार्थना केली मानव आधार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एमडी चौधरी ह्यूमनदास जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी चंद्रशेखर पात्रे यांच्या पत्रकारितेतील व मानवतावादी सेवे कार्याचा गौरव केला.
यावेळी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला शुभेच्छा द्वारे प्रेमाचा वर्षाव केला हा गौरव माझा नसून सर्वांचा गौरव आहे यापुढे वृत्त सेवाद्वारे मानवतावादी सेवा करीत राहील यापुढेही असेच माझ्यावर ज्येष्ठांच्या आशीर्वाद आणि स्नेहाचा स्नेह प्रेम सदोदित राहो असे सन्मानाला पात्रे यांनी उत्तर दिले. यावेळी असंघटित कामगारांचे नेते दीपक चौगुले यांनी चंद्रशेखर पात्रे यांचे गुणवरे करताना म्हणाले चंद्रशेखर पात्रे हे प्रमाणिक पत्रकार आहेत प्रत्येक गोरगरिबांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा काम ते करीत असतात अनेकांचे अडी अडचण ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनच्या माध्यमातून सोडवीत असतात यापुढेही त्यांनी असेच गोरगरिबांना न्याय द्यावा असे मनोगत व्यक्त केले. यावेळी ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तन्वीर मुजावर यांनी पात्रे यांचे स्तुती करताना म्हणाले "गुलाब को गुलाब कहने की जरूरत नही होती उसकी महेक ही बता देती है वो गुलाब है" असे म्हणत चंद्रशेखर पात्रे हे उत्तम पत्रकार कामगार नेते सामाजिक कार्यकर्ते आहेत आत्ताच सध्या त्यांना राष्ट्रीय आदर्श पुरस्कार ने सन्मानित केले गेले आहे त्यांची दखल प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थेने घेतले त्यामुळे शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गेलेले आहे यापुढे यापेक्षाही मोठमोठे पुरस्कार त्यांना लाभो अशी शुभेच्छा तनवीर मुजावर यांनी दिले. यावेळी ह्यूमन राईट्स फोर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी चंद्रशेखर पात्रे यांचे गुणगान करताना म्हणाले पात्रे यांना मी अनेक वर्षापासून ओळखत आहे कामगार क्षेत्रात काम करीत असताना त्यांचे अनेक कामगार क्षेत्रातले नेते नेहमी माझ्यासमोर त्यांचे स्तुती करत होते की अनेक सुरक्षारक्षक कामगार यांना कायद्याचे संरक्षण देऊन त्या गरीब लोकांचे घर त्यांनी वसविले आहे आज पत्रकारिता च्या माध्यमातून अनेक दिन दुबळे गोरगरीब लोकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा काम ते करीत आहेत असे मनोगत एम डी चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय पवार यांनी म्हटले चंद्रशेखर पात्रे आणि माझी मैत्री मागील ४० वर्षापासून ओळखत आहे कामगार क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेऊन त्यांनी अनेक सुरक्षारक्षकांना कायमस्वरूपी काम देऊन त्यांना इतर सवलती मिळवून दिले आहेत आता पत्रकारिता मध्ये ही अग्रेसर भूमिका राखून प्रत्येक कलाक्षेत्र ,क्रीडा, राजकीय क्षेत्रात, बातमी देऊन ते निर्भिड पत्रकारिता करीत आहेत यावेळी विशाल सविधान चे सहसंपादक द जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय महा सचिव ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी चंद्रशेखर पात्रे हे माझे सर्वात जिवलग शिष्य आहे आज अल्पवधीत मोठे भरारी त्यांनी घेतली आहे नुकताच त्यांना आदर्श पत्रकार चा पुरस्कार मिळाला आहे यापूर्वी त्यांना जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार ,उत्कृष्ट कामगार नेते असे अनेक पुरस्कार मिळाले आहे मला अभिमान वाटतो पात्रे हा माझ्या शिष्य आहे व माझ्या तालमीत तयार झालेला निस्वार्थ व निर्भीड धडाकेबाज पत्रकार झाले आहेत. यावेळी सामाजिक नेते महेश गायकवाड यांनी चंद्रशेखर पात्रे यांच्याबाबत म्हणताना म्हणाले चंद्रशेखर पात्रे है असे व्यक्तिमत्व आहे त्यांना कधीही कुठल्याही कामासाठी रात्री अपरात्री बोलवा ते नाही म्हणत नाही ते लगेच धावून येतात माझ्यावर अनेक संकट आले तेव्हा पात्रे यांनी विलंब न करता मला मदत केले याचा अनुभव मी स्वतः घेतलेले आहे आज पत्रकारिताच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आज अनेक लोकांना मदत मिळत आहे व न्याय मिळत आहे. यावेळी देहूरोड शहर राष्ट्रवादी सरचिटणीस दिनेश बालघरे यांनी पात्रे बाबत म्हणताना म्हणाले अनेक वेळा नवीन नवीन योजना कसे राबवावे त्यामुळे इतर लोकांना त्यांचे सुविधा कशी मिळते याबाबतचे भरपूर अभ्यास पात्रे यांना आहे आमचे सारखे कार्यकर्ते वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही काम करीत असतो व त्यामुळे आम्हालाही यश प्राप्त होते केलेल्या प्रत्येक कामाची दखल घेत आपल्या बातम्या द्वारे प्रसिद्धी देऊन लोककल्याणाचा काम ते करीत आहेत त्यांना दिर्घ आयुष्य लाभो जेणे करून ते अजुन सामाजिक काम करत राहतील. यावेळी संदीप बहोत, सुभाष चंडालिया, विजय पवार, विजय चोपडे, पत्रकार रजाक शेख, नारायण देवी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल, मानव आधार सामाजिक संघचे शहर अध्यक्ष सन्नी दुधघागरे, शंकर तल्लारी, कृष्णा तल्लारी, नलारेड्डी मेदारी सह अनेक अनेक लोक उपस्थित होते.