प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पुणे शहर आणि परिसरात ग्रामीण भागात आपण नेहमी आज पण डोंबारीखेळ दाखवणारी मंडळी पहात असाल लहान मुले,मुली दोरी वर चालून आणि जीव धोक्यात घालून कवायत करून पैसे मागतात त्यांच्या बरोबर त्यांचे आई वडील बहीण भाऊ असे यांची पूर्ण मंडळीच असते,रस्त्यावर,सिग्नल किंवा एखाद्या चौकात वर्दळीच्या ठिकाणी ते खेळ दाखून पोट भरतात आणि एकीकडे आपण चंद्रावर पोहचलो आणि दुसरीकडे ही सत्य परिस्थिती आहे की शिक्षणाचं माहेर घर भूषवणाऱ्या शहरात आणि परिसरात अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत .
पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी जीवघेण्या कवायती दाखुन पोट भरतात आणि शहरातील शेकडो सुज्ञ नागरिक त्यांना वगळून जसे की ते खेळ दाखवून पोट भरण्यासाठी जन्माला आले आहे की किंवा ते या जगाचे नाही दुसऱ्या जगातून आले की काय असे दुर्लक्ष करून आपल्या कामात निघून जातात,तर एकीकडे बाल विकास योजना,शीक्षणावर मोठ मोठे भाषणे,आणि दुसरीकडे रस्त्यावर खेळ दाखुन सिग्नल वर भिक मागून पोट भरणारी मुलं, शिक्षणाच्या वयात शिक्षणापासून दूर राहून भीक मागून पोट भरणारी मुलं यांच्याबाबत कोण विचार करणार असा प्रश्न मला नेहमीच पडतो ?