झुगरे वाडीच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

नेरळ--कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असणारी व उपक्रमशील शाळा म्हणून देशपातळीवर नावलौकिक असणाऱ्या झुगरे वाडी शाळेत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी बनविल्या आहेत

 दिवसेंदिवस पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून, वेगवेगळ्या समस्या मानवास भेडसावत आहेत, झुगरे वाडी शाळेत कार्यरत असलेल्या विद्यार्थी पर्यावरण क्लब च्या माध्यमातून आज, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविल्या, या मूर्ती ची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थी च्या काळात केली जाणार असून, उर्वरित मूर्ती घरोघरी विक्री केली जाणार आहेत, त्यातून आलेल्या वर्गणीतून विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू खरेदी केल्या जाणार आहेत, यावेळी श्री नंदादीप चोपडे, श्री रवी काजळे व सर्व शिक्षक उपस्थित होते, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी व पर्यावरण संवर्धन करण्यासाठी फायदा होणार आहे,

   आदिवासी समाज हा मुळातच निसर्ग पूजक आहे त्यामुळे ही पर्यावरण रक्षण चळवळ विद्यार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी मदत होणार आहे,

   पर्यावरण क्लब चे सदस्य मोनिका वाघ, अंकिता पारधी, चंदन झुगरे, अनिता झुगरे, अमोल झुगरे, रसिक पादिर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मूर्ती बनवून इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Post a Comment

Previous Post Next Post