रसायनी -पाताळगंगा विभागाचा जनआक्रोश



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील


१.  पनवेल-कोन-रसायनी आपटा रेल्वेस्टेशन आपटाफाटा

२.  कर्जत खोपोली चौक रेल्वेस्टेशन -दांडफाटा ते रसायनी  रेल्वेस्टेशन

( हे दोन रस्ते रसायनी-पाताळगंगा या औद्योगिक वसाहतीस जोडलेले आहेत. शासकीय मंजूरी होऊनही गेली १२ वर्ष दुपदरीकरण काँक्रीटीकरण सोडाच साधे खड्डेही भरले गेले नाहीत )

महाराष्ट्राचे सुपुत्र व केंद्रीय रस्ते विकास मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनी—

गाझीयाबाद -अलिगड एक्सप्रेस वे (Express way ) जादू केल्या प्रमाणे १०० तासात १०० किलोमीटर बांधून विश्व विक्रम प्रस्थापीत केला . केवढ मोठा आश्चर्य !!!

Dwarka Express Way forms India's First 8 lane elevated road. Truly an Engineering Marvel . 

समृद्धी महामार्ग ५ वर्षात तयार केला.

मा. गडकरी साहेबांनी आपल्या  कारकिर्दीत देशभर रस्त्यांचे जाळे उभे केले . युती सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गही (Express way) त्यांनी तयार केला. मुंबई व इतर शहरात उड्डाण पूल (fly over) चे जाळे  तयार केले . मुंबई-गोवा महामार्गा बाबत ते हतबल झाले. काय असेल याचे कारण? कि १२ वर्षेत्याची वाट पाहावी लागली? 

असाच प्रकार रसायनी - पाताळगंगा या औद्योगिक वसाहतीबाबत घडला आहे . वर उल्लेखलेले दोनही रस्ते गेली अनेक वर्षे शासकीय मंजुरी मिळून सुद्धा तयार केले गेले नाहीत.                 

थोडक्यात रसायनी-पाताळगंगा विभागासंबंधी

रसायनीच्या हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड (HOC) या केंद्रसरकारच्या कारखान्याने या विभागात औद्योगिकरण सुरुवात झाली. त्यानंतर हिंदुस्थान (insectisides) लि. (HIL) हा केंद्रसरकारचा कारखाना येथे झाला . राज्य सरकारचा खत कारखाना (MAIDC) व लोना - डिम्पल या सारखे खाजगी कारखाने रसायनी विभागात आले . विशेष म्हणजे SEBI व ISRO या विभागात कार्य रत आहेत . 

HOC  कारखान्याच्या सपाटीकरणाला सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील मनुष्यबळ नोकरी- उद्योग व्यवसायासाठी या विभागात गोळा झाले . एवढी गर्दी झाली कि या विभागाला कुणी जुनी मुंबई तर कुणी नवी मुंबई (सिडको येण्या पूर्वी ) असे संबोधले जायचे . आजही महामुंबई होण्याची (potential) शक्यता या विभागामध्ये आहे . रसायनी -पाताळगंगा परिसराचा विकास आराखडा तयार केल्यास पनवेल नंतर आणखी एक नवे शहर रसायनी महामुंबई रायगडच्या नकाशावर विराजमान होईल . गरज आहे ती राजकीय इच्छा शक्तीची. 

रसायनी नंतर पाताळगंगा औद्योगिक झोन जाहीर करून तेथे MIDC आली. Relience ,Bombay Dyeing, Cipla असे अनेक छोटे मोठे कारखाने सुरु झाले. त्यानंतर पाताळगंगा Expansion सुरु झाले यामध्ये २०० युनिटला मंजुरी मिळून त्यापैकी अनेक कारखाने चालू झाले आहेत. त्यांची सर्व वाहतूकही वरील रस्त्यानेच होते. कोन ते सावळे परिसरात अनेक गोडाऊन होत आहेत . अवजड वाहनांना खड्डेयुक्त रस्त्यामुळे खूपच त्रासाचे होते. अनेक वेळा अपघाताला सामोरे जाऊन अनेक बळी गेले आहेत . 

आज महाराष्ट्राचे सुपुत्र मा. गडकरी साहेब केंद्रामध्ये रस्ते विकास मंत्री आहेत व कोकणचे सुपुत्र मा. रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत . त्यांनी लक्ष घातले तर या निवडणुकीपूर्वी वरील दोन्ही हि छोटे रस्ते करणे अशक्य नाही. तरी शासनाकडे नम्र विनंती कि त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग सारखे आंदोलन करण्यात या विभागातील नागरिकांना भाग पडू नये. 

बाजार पेठ ( मोहोपाडा )

रसायनी पाताळगंगा विभागाची एकमेव बाजारपेठ ' मोहोपाडा ' हि आहे . रस्त्याचे नियोजन नसल्यामुळे वाहनांची एवढी गर्दी  होते कि चालणेही कठीण होते. अपघात होतात . दुकानांसमोरच वाहने लागल्यामुळे अर्धा अधिक रस्ता त्यातच व्यापला जातो .

मुंबई-गोवा सारखीच वरील दोन्ही रस्त्यांची अवस्था आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नोकरशाही व भ्रष्टाचार यामुळे शासनाचे या रस्त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. विकास साधायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. कोकण रेल्वेचे स्वप्न स्व. बॅरिस्टर नाथ पै यांनी पहिले व मा. मधू दंडवते यांनी ते साकार केले. कोकण रेल्वेचा भव्य दिव्य  सोहळा याच विभागात आपटा रेल्वे स्टेशनवर झाला. आज आपण कोकण रेल्वे धावताना पाहतो आहे. मुंबई-गोवा महामार्ग तयार झाल्यावर कोकणवाटपीयांचे दुसरे स्वप्नही पूर्ण होईल. आमच्या या विभागाचे स्वप्न साकार होण्यासाठी मा. नितीन गडकरी साहेब व मा. रवींद्र चव्हाण साहेब यांनी जातीने लक्ष घालून या दोन छोट्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करून रसायनी-पाताळगंगा करांचे स्वप्न साकार करावे हीच नम्र विनंती . 

जय भारत - जय महाराष्ट्र                    

परशुराम विठ्ठल माळी                                                       

 प्रकल्पग्रस्त -कामगार आंदोलनाचे प्रणेते रसायनी

Post a Comment

Previous Post Next Post