प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रसायनी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.187/2023, भादवि. कलम 379 या गुन्ह्याचा समांतर तपास स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखे कडून चालू होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पो.हवा.1191 राकेश म्हात्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे संशयित इसम नामे 1) सदाशिव मधुकर कदम, 2)राहुल मधुकर कदम, 3) राकेश रघुनाथ मरले, 4)निखिल हरिश्चंद्र मरले सर्व रा. तीघर, ता. कर्जत जिल्हा- रायगड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यातील चोरी केलेले 1,09,000/- किंमतीचे चारचाकी गाड्यांचे टायर अँथोनी कंपनी ,रसायनी येथून चोरी गेलेला असा मुद्देमाल तसेच गुन्हा करतेवेळी आरोपीत यांनी वापरलेले वाहन असे मुद्देमाल आरोपीत यांचे कडून हस्तगत करण्यात आलेला आहे.
*आरोपीत नावे /-*
1) सदाशिव मधुकर कदम,वय.33
2) राहुल मधुकर कदम, वय.27
3) राकेश रघुनाथ मरले,वय.36
4) निखिल हरिश्चंद्र मरले,वय.20
सर्व रा. तीघर, ता. कर्जत जिल्हा- रायगड.
*कारवाई अधिकारी* /-
ASI प्रसाद पाटील, पोहा/यशवंत झेमसे, पोह./संदीप पाटील, पोह./प्रतीक सावंत, पोह./राकेश म्हात्रे, पोना./सचिन वावेकर यांनी केली आहे.पुढील तपास रसायनी पोलीस ठाणे हे करीत आहेत.