आनंद विष्णू पाटील आय.ए.एस अधिकारी यांची केंद्रात अतिरिक्तसचिव पदी बढती

 एक दिवसाने त्यांना अतिरिक्त सचिव म्हणून बढती  मिळाली 


प्रेस मीडिया लाईव्ह

  जिलानी उर्फ मुन्ना शेख 

पुणे दि.,,१६ : आनंद पाटील यांची केंद्र शासनात बदली झाली असून भारत सरकारच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.पाटील यांना दोनच दिवसापूर्वी शिक्षण विभागात संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती मिळाली आणि लगेच एक दिवसाने त्यांना अतिरिक्त सचिव म्हणून बढती  मिळाली आहे,

 श्री आनंद विष्णू पाटील हे 1998 बॅच चे आय.ए. एस अधिकारी असून मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांचे शिक्षण पुण्याच्या एसपी कॉलेजमधून झाले असून पुणे विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.या यापूर्वी ते  तमिळनाडू राज्याच्या राज्यपालांच्या प्रधान सचिव पदी होते.त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.


जिलानी उर्फ मुन्ना शेख सह संपादक प्रेस मीडिया लाईव्ह, मित्र परिवार यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील जबाबदारी साठी शुभेच्छा 



Post a Comment

Previous Post Next Post