नवीन रिक्षा परमिट बंद करा म्हणून अनेक वर्ष संघटना मागणी करत आहे, परंतु कंपन्यांच्या भल्यासाठी सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
अन्वरअली शेख :
पुणे शहरात दिवसोंदिवस मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे. त्यास वाढलेल्या रिक्षांची संख्या सगळ्यात जास्त कारणीभूत आहे . शहरात 125 प्रवाशांमागे मागे1 रिक्षा असावी असा कायदा आहे. आत्ता जवळपास 70 प्रवांश्यांमागे एक रिक्षा आहे, त्याच्या जोडीला हजारो कॅब आहेत. परंतु त्यात रोज नवीन रिक्षांची भर पडत आहे. शहरात ना नागरिकांना चालायला रस्ता आहे, ना रिक्षावाल्यांना धंदा उरलाय. इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या रिक्षाला ना पर्याप्त स्टँड आहेत ना पार्किंग सुविधा, यामुळे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
त्यात आता आगमन होत आहे इलेक्ट्रिक रिक्षांचे त्यांना तर परवानाच बंधनकारक नाही, आणि शासनाचे भरमसाठ अनुदान, त्यामुळे सद्यस्थितीत वाढत्या बेरोजगारी मुळे तरुण मोठ्या संख्येने रिक्षा व्यवसायाकडे वळत आहेत,त्यामुळे येत्या दोन वर्षात लाख एक नवीन रिक्षा रस्त्यावर येणार यात काही शंका नाही. शहराची गरजच नसल्यामुळे ना नवीन रिक्षाचालकांचा व्यवसाय होणार ना जुन्या, परंतु कर्ज न फेडता आल्यामुळे सगळेच कर्जबाजारी होण्याची वेळ येणार आहे.
नवीन रिक्षा परमिट बंद करा म्हणून अनेक वर्ष संघटना मागणी करत आहे, परंतु कंपन्यांच्या भल्यासाठी सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे. याचा निषेध करण्यासाठी बघतोय रिक्षावाला संघटनेकडून आज गुडलक चौक डेक्कन येथे निदर्शने करण्यात आली. त्यास मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी हजेरी लावली होती. तसेच वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या सामान्य नागरिकांनी या उपक्रमास पाठिंबा दिला.
होय आम्हीच जवाबदार आहोत पुण्यातल्या ट्रॅफिक साठी आम्हीच तुंबवलय पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा आशयाचे फलक रिक्षांवर लावून मोहिमेची सर्वात करण्यात आली. तसेच # stopNewRickshawpermit #trafficfreepune&pcmc हे hashtag ट्रेण्ड करा असे युवकांना आवाहन करण्यात आले.