देहुरोड कँन्टोमेंट बोर्डाच्या रूग्नालयात शवागृह सुरू करा; मलिक शेख

 


 प्रेस मीडिया लाईव्ह 

     अन्वरअली :  शेख

 देहूरोड दि.२० कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयामध्ये शवागृह सुरू करावा यासाठी मलिक शेख अध्यक्ष (युवक काँग्रेस देहूरोड शहर) यांनी  कार्यकारी अधिकारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांना पत्राद्वारे निवेदन देऊन विनंती केली आहे.

देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर रूग्नालयात आपल्या प्रयत्नातून गोरगरीब,गरजू  रुग्नांसाठी वाजवी दरात आपण आयसीयू (ICU) बेड ची सुविधा उपलब्ध करून दिली त्या बद्दल आपले मानावे तितके आभार कमीच आहे . परंतू रात्री अपरात्री रूग्नालयात एखाद्या रुग्नाचा किंवा देहुरोड शहर परीसरातील व्यक्ती चा दुर्देवाने मृत्यु झाल्यास मृतदेह ठेवणयासाठी आपल्या रूग्नालयात कुठलीही व्यवस्था नाही त्यामुळे देहूरोड करांचे नेहमीच पळापळ होत असते, अशा परीस्थीतीत मृतदेहाला पिंपरी चिंचवड म.न.पा च्या वायसीयम रूग्नालयात न्ह्यावे लागते त्या ठीकाणी ही मोजक्या शवपेट्या असल्याने कधी कधी मृतदेहा साठी जागा उपलब्ध होत नाही अशा परीस्थीत नातेवाईकांना मोठया अडचणी चा सामना करावा लागतो त्यातच रात्री अपरात्री अशी परीस्थीती उद्भवली तर समस्या अधीकच गंभीर होते . 

आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने अशा परिस्थितीत नागरीकांच्या अडचणी चा विचार लक्षात घेता व शहरातील वाढती लोकसंख्ये चा विचार करून समाजात जशी रूग्नालयाची अंत्यत गरज आहे त्या प्रमाणेच शवागृहा ची देखील आवश्यकता असल्याने डाँ.बाबासाहेब आंबेडकर रूग्नालयात किमान चार शवपेटया असलेले शवागृह ची सुविधा आपण सुरू करावी हि आपणास माझ्या पक्षातर्फे तसेच समस्त देहुरोडकरां तर्फे मी आपणास विंनती करत आहे 

माझ्या या पत्राची दखल घेत आपण कार्यवाही कराल ही अपेक्षा करतो 

 एक प्रत स्थानिक आमदार सुनील शेळके यांना देखील देत आह अशी माहिती दिली त्या वेळी मलिक शेख यांच्या  सोबत पदाधिकारी रईस शेख तालुका उपाध्यक्ष,रोहन राऊत तालुका सरचिटणीस,असिफ सय्यद उपाध्यक्ष देहूरोड शहर,निलेश बोडके उपाध्यक्ष देहूरोड शहर, आणि परिसरातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post