पार्ट टाईम जॉबचे प्रलोभन देवुन गुगल रिव्हयूवर सर्च टास्क देत, त्याव्दारे लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीला केले जेरबंद; ३४ लाख ९७ हजारांची झाली होती फसवणूक.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  प्रतिनिधी : 

पार्ट टाईम जॉबचे प्रलोभन देवुन गुगल रिव्हयूवर सर्च टास्क देत, त्याव्दारे लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

सायबर पोलीस ठाण्यात गुरनं. १०४/ २०२३ भादवि कलम ४२०, ४१९, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अन्वये गुन्हयातील फिर्यादी यांना आरोपीतांनी व्हाट्सअप द्वारे संपर्क साधून त्यांना पार्ट टाइम नोकरीचे बहाण्याने गुगल सर्च टास्क देवून जास्त कमिशन मिळेल असे,आमिष दाखवून त्यांना टास्क पुर्ण केल्यावर कमीशन म्हणून फिर्यादी यांचे बँक अकाउंटला काही किरकोळ रक्कम जमा करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर अधिक फायदया करीता फिर्यादीस टेलीग्राम ग्रुपवर प्रीपेड टास्क करण्यास सांगून वेळोवेळी जास्त रक्कम डिपॉझीट करण्यास लावून त्यांचेकडून विविध टास्क करुन घेतले व कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची रक्कम ३४ लाख ९७ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली होती. म्हणून तक्रार दाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

TECHNOLOGY PVT या कंपनीच्या एजंटाकडे तपास करता आरोपी तुषार अजवानी याने पुरविलेल्या सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची रक्कम ट्रान्सफर केलेले आयसीआयसीआय बँक खाते क्रमांकाची माहिती प्राप्त करुन घेतली. तसेच सदर अकाउंट मधून गुन्हयातील काही रक्कम SPAY TECHNOLOGY PVT या पेमेन्ट गेटवे कंपनीच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली. सदर माहितीचे तसेच SPAY वॉलेट अॅड्रेसवर सदर गुन्हयातील फसवणूकीची रक्कम युएसडीटीच्या स्वरुपात ट्रान्सफर झाल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. गुन्हयातील प्राप्त माहितीचे आधारे आरोपीताचा ठावठिकाणा हा जुहू मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार  १२ सप्टेंबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव,पोलीस अंमलदार,अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, चालक सुनिल सोनुने असे पथक मुंबईकडे रवाना केले.सदर पथकास १३ सप्टेंबर २०२३ रोजी तुषार प्रकाश अजवानी, वय-३७ वर्षे, रा. बी-१२०, वॉटरफोर्ड जुहु लेन, अंधेरी वेस्ट, मुंबई हा मिळून आल्याने त्यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवुन, दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीकडून एक अॅपल कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.तर आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्र. ७, पुणे यांचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने गुन्हयाचे गांभिर्य पाहून १८ सप्टेंबर २०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिनल सुपे-पाटील,पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव,पोलीस अंमलदार अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनिल सोनुने, संदेश कर्णे, नितीन चांदणे, शाहरुख शेख व निलेश लांडगे या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.अशा प्रकारे टास्क फ्रॉड, पार्ट टाईम जॉब, जादा  परतावा तसेच कमीशन मिळेल अशी आमिष दाखविणा-या गुन्हेगारी टोळयांपासुन सावध राहण्याबाबत सायबर पोलीसांनी जनतेस आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post