प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे प्रतिनिधी :
पुणे.. पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना जाहीर निषेध करत निवेदन देण्यात आले
भाजप खासदार "रमेश बिधूडी" यांनी BSP चे मुस्लिम खासदार "कुवर दानीश आली" यांना नवीन सांसद भवनाची संविधान लोकशाहीची गरीमा न राखता हुकूमशाही पद्धतीने एक मुस्लिम खासदार व भारतीय मुस्लिम समाजाबद्दल जातीवाचक बोलून सांसद भवन सारख्या पवित्र मंदिराचा खालच्या पातळीला जाऊन घोर अपमान केला आहे त्यांनी जगाची नाही तर मनाची लाज बाळगत भारतीय मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागावी आणि भाजपा मोदी सरकारने त्यांची खासदारकी रद्द करावी असी मागणी करत जाहीर निषेध करण्यात आला
हे निवेदन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी महिला प्रदेश कार्यध्यक्षा सौ.सिंधुताई तुळवे,पुणे शहर संपर्क प्रमुख संदिपभाऊ शेंडगे,पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मिकांत कुंबळे, युसूफभाई बागवान, चाँदभाई बलबट्टी,जुल्फिकारभाई मेहंदी, सुरेशभाई चावरीया,महिला पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सौ.विजयाताई खताळ, पुणे शहर उपाध्यक्ष हासीमभाई खान,जेष्ठ नागरिक आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष रमाकांत शर्मा(सर), जेष्ठ नागरिक आशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते