'पुणे फेस्टिव्हल ' मध्ये २२ सप्टेंबर रोजी ' ऑल इंडिया मुशायरा '

'डॉ.पी. इनामदार युनिव्हर्सिटी ' , डेक्कन मुस्लिम इंस्टिट्यूट '  कडून आयोजन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या  'पुणे फेस्टिव्हल ' मध्ये २२  सप्टेंबर रोजी उर्दू ,हिंदी शेरोशायरीचा ' ऑल इंडिया मुशायरा ' आयोजित करण्यात आला आहे.डॉ.पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी ' , डेक्कन मुस्लीम इन्स्टीट्यूट '  कडून आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र येथे होईल . 'डेक्कन मुस्लीम इन्स्टीट्यूट' च्या अध्यक्षा  आबेदा   इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . 

पुणे फेस्टिव्हल मधील हा मुशायरा १९९२ पासून सुरु आहे आणि पुण्यातील गणेशोत्सवातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सहभाग या कार्यक्रमात असल्याने या मुशायऱ्याला दोन्ही समाजातील स्नेह आणि  सलोख्याचे प्रतीक मानले जाते.या कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास, पर्यटन  मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.डॉ.पी.ए.इनामदार ( कुलपती, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी , पुणे ) आणि आबेदा  इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) हे अखिल भारतीय मुशायराचे आयोजन करत आहेत.

या मुशायरात सहभागी होण्यासाठी देशातील नामवंत शायरांना निमंत्रित करण्यात आले आहे.त्यात डॉ. मंजर भोपाली (भोपाळ), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकवी (लखनौ), अबरार काशिफ (अकोला), सरदार सलीम (हैदराबाद), सागर त्रिपाठी (वाराणसी),डॉ.कासिम इमाम (मुंबई) फरहान दिल (मालेगाव), अब्दुल हमीद हुनर आणि शाहनवाज काजी सईल इत्यादिंचा समावेश आहे.कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post