पुणे : आखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना १५ सप्टेंबर १९८४ रोजी झाली. त्याच्या पहिल्या अध्यक्ष बेगम अबिदा अहमद या होत्या. आता अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा. नेटा डिसोझा जी आहेत. आज महिला काँग्रेसचा ४० वा वर्धापन दिन आहे. ह्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापनदिना निमित्त आज काँग्रेस भवन येथील ग्राउंड मध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सेक्रेटरी मा. सोनल पटेल यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा केला. यानंतर ‘‘प्रतिज्ञा उज्ज्वल भारत की’’ चे वाचन करून महिलांनी प्रतिज्ञा केली. त्यानंतर महिलांचे मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, गाण्यांच्या भेंड्या आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी कार्याक्रमाच्या संयोजिका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा संगीता तिवारी, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पुजा आनंद, रजिया बल्लारी, उषा राजगुरू, सुंदरा ओव्हाळ, ज्योती चंदेवळ, सोनिया ओव्हाळ, सिमा महाडिक, पोर्णिमा भगत, लता घडसिंग, कविता भागवत, पपिता सोनावणे, गीता तारू, निलोफर शेख आदी महिला उपस्थित होत्या. तसेच यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसवेक रफिक शेख, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.