भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'लावणी ठसका ' या कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला .२३ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला. हार्मनी इन्स्टिट्यूटचे संचालक उपेंद्र लक्ष्मेश्वर यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केला.
या कार्यक्रमात, गिटार,माउथ ऑर्गन,की -बोर्डवर मराठी लावण्या,सुप्रसिद्ध हिंदी गाणी सादर करण्यात आली. अविनाश कुलकर्णी, राजू जावळकर, संदीप शिंगाडे, कैवल्य खिस्ती, दीपाली उपाध्ये, डॉ. सरिता साखळकर, प्रीती करमरकर, सौरभ दामले, सोनाली आगटे ,मिलिंद आगटे, राजवीर ससाणे हे कलाकार सहभागी झाले.संगीत संयोजन कुमार शेल्डेकर यांचे तर निवेदन शशांक दिवेकर यांचे होते.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले . हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८२ वा कार्यक्रम होता.