रुबी हॉल क्लिनिकच्या मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण परवान्याचे नूतनीकरण

 हृदय आणि यकृत प्रत्यारोपणासाठी नवीन  परवानगी 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकच्या मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण परवान्याचे नूतनीकरण केले असून  हृदय आणि यकृत प्रत्यारोपणासाठी नवीन  परवानगी देण्यात आली आहे. रुबी हॉल क्लिनिकचे सल्लागार अली दारूवाला यांनी शुक्रवारी  पत्रकाद्वारे ही माहिती दिली.  

राज्यातील दर्मादाय न्यासाच्या रुग्णालयांची राज्य आरोग्य विभागामार्फत नियमित तपासणी केली जाते.या प्रक्रियेचा भाग म्हणून राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या २२ अधिकार्‍यांच्या  पथकाने रुबी हॉल येथे  गुरुवारी   भेट देवून दैनंदिन कामकाजाशी संबंधित सर्व परवानगी आणि कागदपत्रांची तपासणी केली.रुग्णालयाने  सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली.सरकारी कायदे,प्रक्रिया  आणि नियमांचे पालन केले असल्याचे त्यावरून दिसून आले.राज्याच्या आरोग्य खात्याचे सहायक संचालक  डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पाहणी केली.

राज्याच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिक च्या मूत्रपिंड(किडनी) प्रत्यारोपण परवान्याचे नूतनीकरण केले असून  डॉ. वाडीकर यांनी हा परवाना डॉ परवेझ ग्रांट यांना सुपूर्द केला. हृदय आणि यकृतासाठी नवीन प्रत्यारोपणाची परवानगी देखील रुबी हॉल कडे सुपूर्द करण्यात आली.दरम्यान,गुरुवारी  डॉ ग्रँट आणि अली दारूवाला यांनी महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री  तानाजी सावंत यांचीही भेट घेतली आणि रुबी हॉलच्या आरोग्य सेवेची माहिती दिली.'रुग्णांच्या सेवेसाठी रुबी हॉल क्लिनिक अविरत कार्यरत असून शासनाकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले',असे अली दारूवाला यांनी सांगितले. 

फोटो :

१. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या समवेत डॉ परवेझ ग्रांट,अली दारूवाला 


२. डॉ प्रशांत वाडीकर यांच्या समवेत डॉ परवेझ ग्रांट 

Post a Comment

Previous Post Next Post