प्रेस मीडिया लाईव्ह :
अल्ताफभाईंच्या राजकीय, सामाजिक सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील अष्टपैलू कार्याची दखल तानाजी पाथरकर यांच्या संघटनेने घेत त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिग्गज व्यक्तीमत्त्व झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेचे भगवानराव वैराट साहेब यांच्या हस्ते देण्यात आला कोणताही राजकीय वारसा नसलेल्या अल्ताफभाईंनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सुरुवातीच्या काळात छोट्या समाजकल्याण कार्यक्रमांनी केली.नंतर त्यांच्या जनहितार्थ उपक्रमामुळे प्रभावित होऊन त्यांचा जनाधार वाढतच गेला
प्रत्येकाला पहिल्या झटक्यात यश मिळेलच असे नाही अपयश आले तरी त्यावर स्वार होऊन झेप घेण्याची हिंमत ठेवावी लागते नैतिकता जपून जे लढतात त्यांना यश नक्कीच प्राप्त होते अल्ताफ भाईंनी आजपर्यंत जे जनहितार्थ विषय हातात घेतले त्यात ते अनेक अडचणीवर मात करून विजयी झाले
सार्वजनिक जीवनात काम करीत असताना अथक अविरत नियोजनपूर्वक प्रयत्न करावे लागतात, त्याग करावा लागतो, धाडस करावं लागत धोके पत्करावे लागतात आयुष्य पणाला लावाव लागत त्यावेळी तो व्यक्ती त्याच्या मेहनतीच्या बळावर पुरस्काराचा मानकरी ठरतो
आपण वरील फोटोत जे पाहतोय हा मान अल्ताफभाईंनी केलेल्या सत्कार्याला प्रोत्साहन, प्रेरणा देणारा नक्किच आहे यातूनच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळीना ते जे त्याग पत्करून सर्व सामान्य लोकांसाठी कार्य करतात त्याचे कोणीतरी दखल घेतेच हा विश्वास प्रत्येकाला येईल हे निश्चित
कोणत्याही कुटुंबाचं, गावाचं, राज्याचं, देशाचं वा समाजाचं स्थैर्य, प्रगती, भरभराट ही त्यातल्या विविध घटकांतील बंधुभाव, सामंजस्य आणि शांततेवर अवलंबून असते . ज्या कुटुंबात, समाजात, गावात, राज्यात वा देशात आंतरिक ऐक्य नसतं, ते कुटुंब, तो समाज, तो गाव, ते राज्य वा तो देश यादवीच्या खाईत फेकला जातो , अल्ताफभाईना पुरस्कार देऊन एक धार्मिक बंधुभाव सामाजिक ऐक्य तानाजी पाथरकर यांच्या संघटनेने जोपासला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभारच हा पुरस्कार जसा अल्ताफभाई यांच्यासाठी अभिमानास्पद आहे तसाच तो एकता ग्रुपच्या सर्वच सदस्यांसाठी अभिमानास्पद आहे कि हा पुरस्कार आपल्या नेत्याला मिळाला