हजरत महमद पैगंबर जयंती निमित्त विद्यार्थ्यांची भव्य अभिवादन मिरवणूक

मिरवणुकीद्वारे दिला शैक्षणिक, सामाजिक ,पर्यावरणाचे संदेश


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने शनीवार, दि ३० सप्टेंबर रोजी  ‘हजरत महमद  पैगंबर जयंती’(ईद-ए-मिलाद)निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८. ३०  वाजता संस्थेचे अध्यक्ष  तसेच 'डॉ.पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी 'चे कुलपती डॉ.पी.ए. इनामदार  यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. हजरत महम्मद पैगंबरांचे शैक्षणिक, सामाजिक संदेश, घोषवाक्याचे फलक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. 

कुलगुरू डॉ.एम.डी. लॉरेन्स,संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख, शाहिद इनामदार, एस. ए. इनामदार, डॉ. नाझीम शेख, असीफ शेख, मशकूर शेख, साबीर शेख, अफझल खान, सिकंदर पटेल, तसेच गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, एमएमईआरसी, डेक्कन मुस्लिम लायब्ररी, अवामी महाज संस्थेचे पदाधिकारी, व आझम कॅम्पस शिक्षण संकुलाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणूक आझम कॅम्पस येथून निघून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ‘ट्राय लक हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज आणि आझम कॅम्पस गेट येथे मिरवणुकीची सांगता झाली.अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १९ वे वर्ष होते.



Post a Comment

Previous Post Next Post