पुण्यात आज पहाटे पासून पावसाला सुरुवात



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : आज  पहाटे  पासून पावसाला सुरुवात झाली आहे  मागील काही दिवसांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतली  होती.  उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले होते . आज सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकर सुखावले आहेत.पुणे शहरातील वारजे, शिवणे कात्रज, कोंढवा, स्वारगेट, तसेच सिंहगड रोड परिसरात पाऊस पडत आहे.

पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता

पुण्यात पुन्हा एकदा पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने बैठक बोलावली  असून  या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात  येत आहे. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अजून  कळलेले नाही . पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा या धरणांमध्ये सध्या 27.60 अब्ज घनफूट इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने हा पाणीसाठी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत पाण्याचं नियोजन कसं करायचं?, यावरही सखोल चर्चा केली जाणार आहे. पुणे शहराला दरवर्षी 18.5 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. यंदा पावसाने दडी मारल्याने पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांना कमीत कमी पाण्यात गरज भागवावी लागणार आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा दर गुरुवारी पाणीपुरवठा कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post