प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर ‘जनसंवाद’ पदयात्रा काढण्यात येत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कसबा विधानसभा मतदार संघातील मामलेदार कचेरी येथून ‘जनसंवाद’ पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेचे नियोजन माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने व हेमंत राजभोज यांनी केले होते. ही पदयात्रा मामलेदार कचेरी - बाबुराव जगताप पुतळा - विनय ढेरे निवासस्थान - पाणघंटी चौक - जैन मंदिर - सुभानशहा दर्गा - भोरे आळी - सोन्यामारूती चौक - फडके हौद चौक - सिंग सायकल मार्ट - कसबा गणपती - लाल महल पर्यंत काढून पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
या पदयात्रेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी या पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, देशातील जनता महागाईने त्रस्त आहे, सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले असतानाही मोदी सरकारला महागाई दिसत नाही. सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते पण मागील ९ वर्षात मोदी सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवू शकले नाही. ९ वर्ष जनतेची लूट केल्यानंतर आता त्यांना जनतेची आठवण झाली असून गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. गॅस स्वस्त केल्याचा भाजपा व मोदी सरकार मोठा गाजावाज करत आहे परंतु ते खरे नाही. या जनसंवाद यात्रेत मोदी सरकारने ९ वर्षात जनतेला कसे लुटले याची माहिती दिली जात आहे.’’
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, ॲड. अभय छाजेड, अनंत गाडगीळ, दिप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, पुजा आनंद, रजनी त्रिभुवन, मुख्तार शेख, सुधीर काळे, भोला वांजळे, शिवराज भोकरे, योगेश भोकरे, विनय ढेरे, हनुमंत पवार, परवेज तांबोळी, गणेश शेडगे, ॲड. शाबीर खान, मुन्ना खंडेलवाल, नरेश नलावडे, जयसिंग भोसले, सईद सय्यद, हेरॉल्ड मॅसी, राकेश नामेकर, रवि पाटोळे, सौरभ अमराळे, नितीन येलापूरकर, श्रावण भोकरे, राजेंद्र पडवळ, गौरव बालांदे, राजू शेख, वाल्मिक जगताप, सुमित डांगी, अंजली सोलापूर, गीता तारू, अनुसया गायकवाड, अनिता धिमधिमे, रजिया बल्लारी, शारदा वीर, इंदिरा अहिरे, सिमा सावंत, छाया जाधव, अश्विनी गवारे, ज्योती चंदवेल, अभिजीत महामुनी, रवि आरडे, राजू ठोंबरे, स्वप्निल नाईक, उषा राजगुरू, निलोफर शेख, सोनिया ओव्हाळ, नलिनी दोरगे, माया डुरे, मंदाकिनी नलावडे, भारती कोंडे, ओंकार धावडे, अक्षय पाटील आदींसह असंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.