व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल करंडक



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे फेस्टिव्हलचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे. त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापैकी एक स्पर्धा म्हणजे व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल'. ही हिंदी सुगम संगीत स्पर्धा असून वय वर्ष ४० च्या आतील व ४० च्या पुढे, महिला व पुरुष अशा चार वयोगटात स्पर्धा घेतली जाते. सर्वोत्कृष्ट गायक व गयिकेस, 'व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल' पुरस्कार देण्यात येतो. 

सदरील स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष असून, सदरील स्पर्धा या दिनांक 16 व 17 सप्टेंबर रोजी M स्टुडिओ मुकुंद नगर पुणे, घेण्यात आल्या.

यावर्षीपासून प्रथमच अंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण १० कॉलेजेस पैकी तीन कॉलेजेसची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. डी वाय पाटील कॉलेज पिंपरी,सर परशुराम महाविद्यालय (एस पी कॉलेज) व पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (PVG)  असे तीन महाविद्यालयांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती करंदीकर, गझल गायक डॉक्टर अविनाश वाघ व ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे आणि परीक्षक म्हणून काम पाहिले.

अंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिर येथे 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेचार पासून सुरु होणार आहेत. अंतिम फेरीसाठी प्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत या जोडीत परीक्षक म्हणून बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे 'बाई पण भारी देवा' चित्रपटाचे उभरते संगीतकार साई पियुष यांनाही आमंत्रण केलेलं आहे. 

अंतिम फेरीमध्ये जे महाविद्यालय विजेते ठरेल, त्यास यंदाच्या वर्षीचा 'प्रथम पुणे फेस्टिवल करंडक' देण्यात येणार आहे. हा फिरता करंडक चषक असून पुढील गणेश उत्सवा पर्यंत तो चषक त्या कॉलेज कडे राहील. पुढील वर्षीच्या गणेश उत्सवा अंतर्गत होणाऱ्या 'व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल' स्पर्धेमध्ये होणाऱ्या विजेत्या महाविद्यालयाकडे, तो चषक करंडक जाईल.


ऍडव्होकेट अनुराधा भारती

94220 78956

Post a Comment

Previous Post Next Post