गणेश भक्तांना ५०,००० पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अवामी महाज, पुणे महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी डॉ. पी. ए. ईनामदार विद्यापीठ, पुणे दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत येणाऱ्या सर्व मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व बंधु भगिनिंचे हार्दिक स्वागत करून मंडळांचे सत्कार डॉ. पी. ए. इनामदार कुलगुरु, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ यांचे हस्ते करण्यात आला .
दर वर्षी प्रमाणे यंदा ही सर्व येणाऱ्या गणेश भक्तांना ५०,००० पाणी बॉटल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मशकुर अहमद शेख हाजी सईद सय्यद, मोहम्मद गौस (बबलु सय्यद), उमर शरीफ मो. शेख, आसिफ अय्युब शेख व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी केले