प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गणपती , दिवाळी दसरा , पाडवा आला की सुट्टी आहे म्हणून लोक बाहेरगावी जाण्यास उत्सुक असतात , कोण लालपरीने प्रवास करतात तर खासगी बस ट्रॅव्हल्स ने प्रवास करतात. सण असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांचे फावते , नियमित 250 ते 300 रुपयात जाणारे ट्रॅव्हल्स वाले सणामुळे 700 ते 800 रू. तिकिटाचे दर प्रवाश्यान कडून आकारतात . ज्याची परिस्थिती आहे तो जातो , पण इतके भाडे ट्रॅव्हल्स वाले घेतात कसे..?
ट्रॅव्हल्स वाले मनमानी करत सणाचा व गर्दीचा फायदा घेत तिकिटाचे भरमसाठ दर आकारतात कशाच्या आधारावर हे लोक इतके भाडे आकारतात याची चौकशी झाली पाहिजे . अशी मागणी प्रवाश्यान कडून होऊ लागली आहे. लालपरीचे जे तिकिटाचे दर आहेत त्याच्या डबल तिबल पैसे खासगी ट्रॅव्हल्स वाले घेताना दिसून येतात. ही तर प्रवाशांची लुबाडणूक आहे.