प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे दि.,,१६, तामिळनाडू केडर चे वरिष्ठ आय.ए.एस (TN 1998) ,अधिकारी व तामिळनाडू राज्यपालांचे प्रधान सचिव आनंद पाटील यांची केंद्र शासनात बदली झाली असून भारत सरकारच्या शिक्षण विभागाचे सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्री आनंद विष्णू पाटील हे 1998 बॅच चे आय.ए. एस अधिकारी असून मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत.त्यांचे शिक्षण पुण्याच्या एसपी कॉलेजमधून झाले असून पुणे विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.या यापूर्वी ते तमिळ तमिळनाडू राज्याच्या राज्यपालांच्या प्रधान सचिव पदी होते.त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.