*पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष पदी राज मुजावर यांची नियुक्ती*

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी  राज मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी(टी डी एफ) चे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते मुजावर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी,टी डी एफ चे कार्याध्यक्ष जी. के. थोरात,मुरलीधर मांजरे (अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक संघ), वसंतराव ताकवले (अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी-टी डी एफ) यांनी  अभिनंदन केले.

राज मुजावर हे  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य असून टी डी एफ  संघटनेत अनेक वर्ष कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून टी डी एफ संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्याच्या प्रयत्न करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post