महाराष्ट्र जनता दलातील बहुतांशी कार्यकर्त्यांना देवेगौडा यांची भूमिका व भाजपाशी युती मान्य नाही

 पुढील चर्चा व निर्णेय यासाठी दि. 30 सप्टेंबर रोजी पुणे येथे बैठक - प्रताप होगाडे.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे ,दि. २३ - "एचडी कुमारस्वामी यांनी एचडी देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे अमित शहा व जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तथापि भाजपाशी युती ही भूमिका महाराष्ट्रातील बहुतांशी सर्व जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जैनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष राज्य कार्यकारीणी सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुणे येथे शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

या बैठकीत पुढील भूमिका, धोरण व निर्णय घेण्यात येईल." अशी भूमिका व माहिती या बैठकीचे निमंत्रक प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. विलास सुरकर, श्रीमती साजिदा निहाल अहमद, मनवेल तुस्कानो, सलीम भाटी, अॅड. रेवण भोसले, अॅड. नंदेश अंबाडकर, युयुत्सु आर्ते, विठ्ठल सातव, प्रकाश लवेकर, दत्तात्रय पाकिरे यांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

यासंदर्भात सामुदायिक विचारविनिमय व सामूहिक निर्णय होणे आवश्यक आहे. त्यासाठी शनिवार दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता समाजवादी व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारे राज्यातील जनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारीणी सदस्य व निमंत्रित प्रमुख कार्यकर्त्यांची * राज्यस्तरीय व्यापक बैठक राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय, साने गुरुजी स्मारक, * 587, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रोड, दांडेकर पूल, पुणे 30 येथे आयोजित करण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती 'मा. बी. जी.कोळसे पाटील हे उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार आहेत.

"महाराष्ट्रातील बहुतांशी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष या विचारसरणीमधून आलेले आहेत. हे सर्व कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष व विज्ञाननिष्ठ विचारधारेचे आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील संविधान विरोधी, लोकशाही व जनहित विरोधी, मनुवादी फॅसिझमच्या पुरस्कर्त्या धर्मांध व जातीयवादी भाजपा संघ प्रणीत राजकारणाचा, राज्य आणि केंद्र सरकारचा व अशा सर्व प्रवृत्तिंचा विरोध करणे ही जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षाची व कार्यकर्त्यांची भूमिका प्रथमपासूनच होती, आजही तीच आहे आणि पुढेही तीच कायम राहील" अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र जनता दलाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली आहे.

जनता दल सेक्युलर या पक्षाच्या घटनेमध्येच स्पष्टपणे या देशाचे संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन या प्रती निष्ठा आणि त्यासाठी आवश्यक तेथे म. गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रह या मार्गाने विरोध, हे संकल्प अंतर्भूत आहेत. असे स्पष्ट असतानाही भाजपाशी युतीचा राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय हाच पक्षाच्या घटनेच्या विरोधी आहे. त्यामुळेच मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यातील पक्ष संघटनांनी देवेगौडा यांच्या या भूमिकेला स्पष्ट विरोध केला आहे. आणखी कांही राज्यांतील पक्ष संघटनाही त्याच मार्गावर आहेत. अशीही माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये शेवटी देण्यात आलेली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post