प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
व्हॉइस ऑफ मीडिया विजेच्या तेजा प्रमाणे भारतभर आपली पाळेमुळे रोवणारी बहुभाषिक पत्रकारांची संघटना ठरत आहे, या बाबत पुणे जिल्हा अध्यक्ष शोएब अन्सारी यांच्या तर्फे मिळालेली माहिती प्रमाणे....
"व्हॉइस ऑफ मीडियाचा" दिमाखदार सोहळा जळगाव शहरात २४ सप्टेंबर रविवारी आयोजित करण्यात आला होता . खान्देशची मुलुख मैदान तोप म्हणून ओळखले जाणारे मुफ्ती हारून नदवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात पत्रकारांवर होणारे भ्याड हल्ले यावर नदवी यांनी ठळक आणि प्रखर भाष्य केले,तर संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकारांना हक्काचे घर, पेन्शन, आरोग्य विमा, अपघात विमा आदींविषयी आपले विचार व्यक्त केले. जिल्ह्यात प्रथमच आयोजित ह्या अनोख्या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक नेते एकनाथराव खडसे, शहराचे आमदार राजू मामा भोळे, डॉ.भंगाळे, डॉ. चांडक, अनिल म्हस्के., राष्ट्रीय अध्यक्ष संदीप सालार, महापौर जयश्री ताई, मुस्लिम विंग अध्यक्ष शरीफ बागवान एजाज मलिक व इतर नेते, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आणि विशेषतः महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, पुणे, अकोला येथून, शेगाव, भुसावळ, धुलिया., मालेगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर,अडावद, चोपडा, मुक्ताईनगर, फैजपूर औरंगाबाद, नांदेड, बीड सिल्लोड, लोहारा आणि
- एमपीके खांडवा, खरगोन आणि बुरहानपूर आणि विविध शहरातील मुस्लिम पत्रकार मोठ्या संख्येने या ऐतिहासिक संमेलनात सहभागी झाले होते, हा एक अभूतपूर्व कार्यक्रम ठरला. देशातील बहुभाषिक पत्रकारांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या व संदीप काळे यांच्या माध्यमातून खंबीर नेतृत्व लाभले असल्याचे प्रतिपादन मुफ्ती हारून नदवी यांनी केले.