प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वर अली शेख
दापोडी गावातून स्वतंत्र बस व्यवस्था चालू करण्यात यावी या करिता पी.एम.पी.एल महा व्यवस्थापक संचालक सचिंद्र प्रताप सिंग व चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे यांच्या कडे भाजपा सचिव विशाल वाळुंजकर निवेदन देऊन मागणी केली.....
दाट लोकवस्ती असलेले दापोडी हे पिंपरी चिंचवड शहरातील उपनगर असून ,पुणे मनपा मध्ये दापोडी असताना पूर्वी जुना पुणे मुंबई हायवे रस्ता येथे स्वतंत्र बस स्थानक होते, त्यानंतर ते दापोडी गावात तून बस स्थानक सुरू करण्यात आली त्याला 11 नंबर बस स्टॉप या नावाने ओळखले जावे लागले होते... सर्व बस उत्तम प्रकारे चालू होत्या व प्रवाशांना सुद्धा याचा चांगला उपयोग होत होता, काही कारणास्तव आपल्या पुणे परिवहन विभाग कडून पिंपळे गुरव बस स्थानक चालू करण्यात आल्याने सर्व दापोडी गावचे बस व्यवस्था ही पिंपळे गुरव मार्गे दापोडी चालू करण्यात आले पण बहुता सर्व बस ह्या पूर्ण भरून पिंपळे गुरव येथून येत असल्याने दापोडीतील नागरिकांना प्रवाशांना उपयोग होत नाही...
आपल्या ह्या गैरसुविधांचा दापोडीकरांना मनस्ताप व त्रास होत आहे अनेक प्रवासी अन्य वाहतुकीचा उपयोग करत आहे,तरी याचा भाजपा च्या वतीने निवेदनातून निषेध करण्यात आला आहे,तरी याबाबत पी.एम.पी. एल महाव्यवस्थापक संचालक सचिंद्र प्रताप सिंग यांनी या मागणी बाबत लवकर तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले...
या आधी ही प्रवाशांकडून व तसेच भाजपा कडून दापोडी गावांमध्ये स्वतंत्र बसव्यवस्था चालू ठेवण्याबाबत मागणी करण्यात आली होती पी.एम.पी.एल विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे ...यामुळे दापोडी गावातून स्वतंत्र बस व्यवस्था चालू न झाल्यास पुणे परिवहन महानगर लिमिटेड विरुद्ध भाजपा वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .