कोंढव्यातील अनधिकृत बांधकामे करून हॉटेल व्यावसाय करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 .....तर पालिका तोंड बघून कारवाई करत असल्याचा आरोप..? 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे शहरातील कोंढवा भागातील कौसरबाग येथे पत्र्याचे शेड उभारून अनधिकृतपणे हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर पालिकेने आज सकाळी होतोडा चालवला आहे. अचानक पणे कारवाई करण्यात आली असल्याने अनधिकृत पणे हॉटेल व्यावसाय करणाऱ्यांमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. 




बेकायदेशीरपणे बांधकाम होत असल्याने पुणे महानगर पालिकेकडे तक्रार वाढल्याने पुणे महानगर पालिकेकडील बांधकाम विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. परंतु काही अनधिकृत पत्र्याचे शेडवर कारवाई करण्यात आली आहे तर काहींवर कारवाई झाली नसल्याने, तोंड बघून कारवाई केली जात असल्याचा आरोप आजूबाजूच्या नागरिकांनी केला आहे. कारवाईचे नियम सर्वांना सरसकट असताना फक्त काहीच पत्र्याचे शेडवर कारवाई केली गेल्याने अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.





Post a Comment

Previous Post Next Post