प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील मेट्रोच्या कामामुळं बोपोडी चौक ते संविधान चौकातील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. त्यामुळं वाहनचालकांना चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. परंतु आता मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं एक सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांनाही बोपोडी चौक ते संविधान चौकापर्यंत ये-जा करता येणार असल्याची माहिती पुण्यातील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुख्य रस्ता खुला झाल्याने वाहन चालकातून आनंद व्यक्त केला जात आहे.
बोपोडी चौकातून शिवाजी नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना खडकी रेल्वे स्टेशन, सीएफव्हीडी, फुटबॉल मैदानासमोरून डावीकडे वळत ऑर्डिनन्स फॅक्टरीकडून संविधान चौकातून इच्छितस्थळी जाता येईल. तर खडकी बाजार येथून पिंपरी चिंचवड आणि भोसरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना संताजी घोरपडे मार्गावरून सीएफव्हीडी चौकातून उजवीकडे वळत इच्छित स्थळी जाता येईल.