पूर्वी पाणी साचलेल्या डबक्यात बेडके ओरडून ध्वनी प्रदूषण करत होते,
हल्ली वाहतूक कोंडीमुळे कर्कश आवाज , पॅटर्न बदलय परिस्थिती तीच
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड : आज पहाटे पासूनच पावसाला सुरुवात झाली होती मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर येथे पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्यामुळे शहरवासी हैराण झाले होते . आज मात्र सुरू झालेल्या पावसामुळे नागरिक सुखावले तर दुसरी कडे त्रस्त ही झाले आहेत , शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले त्यामळे वाहतूक कोंडी शहरातील विविध भागात रस्त्यावर पाणीच - पाणी, पाण्याच्या खाली रस्ते ठिकठिकाणी खड्डे रस्त्याच्या कडेला पाण्याची डबके, भुयारी मार्गांना तळ्याच स्वरूप, सकाळच्या पाहरी कामाला जाणाऱ्या नागरिकांना,वाहन चालकांना कवायत करावी लागत होती, वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर साचलेले पाणी अंगावर उडल्यामुळे काही ठिकाणी तुरळक बाचाबाची चे प्रकार ही घडत होते, वाहतूकोंडीमुळे ऑफिस, कॉलेज, कंपनी,कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होत होता म्हणून काही नागरिक परचंड संताप व्यक्त करत होते, *पावसामुळे शहरातील हवामान थंड झाल पण शहरवासी गहाळ कारभारामुळे मात्र तापतच होते.*
रस्त्यांवरील पाण्याचा निचरा का होत नाही? गटारी नाले तुंबलेले अवस्थेत का आहेत? रस्त्यांवर खड्डे का?रस्त्याच्या कडेला पाण्याचे डबके कशामुळे झाली ? आता नवीन पद्धतीने तयार झालेले रस्ते ठिकठिकाणी जल मय का होत आहे ? पाऊस आला की विद्युत्व पुरवठा का खंडित होतो? या सर्व परस्तीतीला जवाबदार कौन ? जनता की प्रशासन ? असे अनेक प्रश्न जिवंत मेंदूत ठोके मारत सतत असतो