सेलूत सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आदोलंन.



   प्रेस मीडिया लाईव्ह : 

शिवाजी शिंदे :  परभणी. 

सेलू: जालना जिल्हा तील आंतरवाली सराटी येथे मराठा आदोंलकावर झालेल्या लाठी हल्याचा सेलू येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तिव्र निषेध करून सोमवार  ४ सप्टेंबर   रोजी येथील  उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया समोर दोन तास ठिय्या आदोलंन करण्यात आले.

या वेळी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने समाज बांधव व  माता भगीनींची मोठी ऊपस्थिती होती, लोकशाही पद्धतीने त्या घटनेचा तिव्र निषेध करत असतांना सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आदोलंनाची सूरूवात जिजाऊ वंदनाने करण्यात आली. तसेच या वेळी उपस्थित माता भगीनींनी भजन म्हणून सरकारचा निषेध केला,मराठा आरक्षनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा , आंतरवाली सराटी येथील आदोलंककावर दाखल करण्यात आलेले सर्व गून्हे बिना शर्त मागे घेण्यात यावे,

हल्या मागे असलेले शासन, व प्रशासना तील दोषी व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या प्रमूख तिन मागण्या निवेदना द्वारे  व मनोगतातून राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या कडे करण्यात आले आहे, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंञी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरवाली येथील आदोलंकावर पोलिसा कडून लाठी हल्ला करण्यात आला आहे, यात अनेक महीला, पूरूष,वयोवृद्ध नागरीक,जखमी झाले आहेत, ही बाब प्रशानास लाजिरवानी असल्याचे देखिल निवेदनात नमूद करण्यात आहे. त्या मूळे येथील सकल मराठा समाजा कडून तहसिलदार दिनेश झांपले यांनी शांततेच्या मार्गाने आदोंलन करण्यात आल्या मुळे सकल मराठा समाजाचे आभार मानले.   या आदोलंनात मोठ्या संख्येने समाज बांधव सामिल झाले होते. आदोलंन शांततेच्या मार्गाने करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post