विद्यार्थिनींनी यशाची उत्तुंग झेप घ्यावी - संगीता खराबे.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

शिवाजी शिंदे  : परभणी.

सेलू : विद्यार्थिनींनी जिद्द, चिकाटी, मेहनत या द्वारे आपले ध्येय साध्य करीत यशाची उत्तुंग झेप घ्यावी हीच शिक्षक दिनी आम्हास भेट होईल." असे प्रतिपादन श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्या पिका संगीता खराबे यांनी केले. नूतन कन्या प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता खराबे,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल,प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी कला शिक्षक श्याम बारस्कर,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर,हेमलता देशमुख ,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या  वेशभूषेत असलेल्या पल्लवी सातपुते यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने आणि स्वागत गीताने झाली. या प्रसंगी  साक्षी शेवाळे,जोया शेख,प्राप्ती अवचार, उन्नती भोसीकर या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.10 वी ड च्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आणि वर्गशिक्षिका सुरेखा आगळे,कीर्ती राऊत आणि गजानन मजगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कंधारकर समिक्षा हिच्या शिक्षकांप्रति आदर व्यक्त करणाऱ्या नृत्याने सर्वांची मने जिंकली.सर्व शिक्षकांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. तसेच तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनींचे या प्रसंगी  अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन  किशोर ढोके,वायाळ सुमेधा, पठाण इसरा यांनी केले.तर आभार माधवी मगर  हिने मानले.

कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post