प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. शिवाजी शिंदे : परभणी.
परभणी : मराठवाड्यात त्याकाळी शिक्षणाच्या कोणत्याही संधी नसताना उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात जाण्याचा प्रागतिक विचार कमलताई ( मुंडे ) जामकर यांनी केला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू 'मायेची सावली कमलताई ( बाई ) या ग्रंथात उमटले आहेत. एका अर्थाने हा ग्रंथ तत्कालीन स्त्री जीवनाचं ही नेमके दर्शन घडवतो. असे प्रतिपादन साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे यांनी केले.नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित मायेची सावली कमलताई (बाई )या ग्रंथाच्या विमोचन सोहळ्याच्या सुरुवातीस कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. जामकर परिवाराकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी प्रास्ताविकातून पुस्तक निर्माण संकल्पने विषयी मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, प्रमुख पाहुण्या सौ.जयश्रीताई देवकर,सौ.राजश्रीताई पंडित, सौ.मंगलताई वाकुरे यांचे हस्ते ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.आसाराम लोमटे.संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. किरणराव सुभेदार, कोषाध्यक्ष डॉ.अभयराव सुभेदार, सचिव विजयराव जामकर, सहसचिव डॉ. संजयराव टाकळकर, संचालक ॲड.बाळासाहेब जामकर,ॲड.मंगेशराव सुभेदार,सौ.दिपलक्ष्मीताई सौ.कविताताई सुभेदार, गोविंदराव नांदापूरकर,संग्राम भैय्या जामकर, अजिंक्यदादा जामकर, कीर्तमालती जाधव, सौ.शेळके,सौ.शैलाताई चव्हाण,सौ.मंजूषा बागल,सौ.मधुमालतीताई मुंडे, डॉ.ज्योतीताई मुंडे,सौ.शिल्पाताई मुंडे, जयश्रीताई मुंडे, सौ.संध्याताई जामकर,सौ.सोनिया ताई जामकर, सौ.वसुंधराताई जामकर,सौ.नेहाताई जामकर, सौ.मिनाताई टाकळकर, डॉ जयश्रीताई यादव,प्रतिमा देशमुख, डॉ.नामदेवराव वाकुरे,डॉ.मोहनराव मुंडे, किशोरराव मुंडे, प्राचार्य डॉ. शिवाजीराव मुंडे, हेमंतराव मुंडे , विठ्ठलराव शेळके,बबनराव देशमुख, हनुमंतराव देशमुख, दिगंबरराव देशमुख,विक्रांतजी देवकर, रणवीर राजे पंडित,ॲड.सुनिलराव बागल, राजेंद्र मौजकर,प्रा.सुनिलराव चव्हाण,प्रा.बाबासाहेब जाधव, उपप्राचार्य सतिशराव जाधव, प्राचार्य डॉ वसंतराव भोसले,आर.के.चव्हाण, मुख्याध्यापक जी.एन.शिंदे,सौ.जयश्री हत्तीअंबीरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.संपूर्ण कुटुंबाला सामावून घेण्याचा आणि कुटुंबाला एका धाग्यात गुंफण्याचा कमलताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू 'मायेची सावली' मधून दिसून येतो. सर्व कुटुंबीयांनी, आप्त, नातेवाईकांनी कमलताईंच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा दिला आहे. तीन दशकांपूर्वी परभणी सारख्या ठिकाणी मुलींना महाविद्या लयीन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नूतन महिलामहाविद्या लयाच्या रूपाने झाला यात कमलताईंचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. माजी मंत्री रावसाहेब जामकर यांनी परभणीत ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाट्य संमेलन यासारखे सांस्कृतिक उपक्रम राबवले. परभणीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ही आधी मराठवाड्यातील स्त्री लेखिकांचा मेळावा कमलताईंच्या स्वागताध्यक्षते खाली पार पडला होता. स्त्रियांच्या अभिव्यक्तीला वाव देण्यासाठी तब्बल तीन दशकांपूर्वी या प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम घेणे ही एक महत्त्वाची बाब असल्याचे डॉ.आसाराम लोमटे यांनी सांगितले. माहेरच्या कडक शिस्तीत ही कमलबाईं सर्वांशी समरस होत,संवाद साधत.त्यांच साधं,सोज्वळ,त्यागी,निगर्वी व्यक्तीमत्व आम्हा सर्वांसाठी प्रेरक प्रेरणा होती.बाईं शिक्षणाचं महत्त्व जाणून होत्या. माझं शिक्षण त्यांच्यामुळेच पूर्ण झाल. समाज कार्यातही त्या अग्रणी असतं गरजवंतासाठी नेस्टटूमदरच असल्याचे मत सौ.मंगलताई वाकुरे यांनी व्यक्त केले.
जामकर कुटुंबाशी मुंडे परिवाराचे नातं तसं भाग्याचच. कमलबाई माझ्यासाठी प्रति आईचं.त्यांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालो.माझ्या करिअरची सुरुवात आणि नोकरी पण बाई मुळेच.आमचे दाजी रावसाहेबजी जामकर साहेब आणि कमलबाई माझे भाग्यविधाते असल्याची भावना प्राचार्य डॉ. शिवाजीराव मुंडे यांनी व्यक्त केली माझी आई भाग्याची.श्रीमंतीत जन्मली,श्रीमंती शेवट पर्यंत उपभोगली. आम्हा सर्व भावंडां वर चांगलें संस्कार केले.तिनं अनेकांना मदत करत आधार दिला.जामकरांच्या वैभवात भर घालणारी आमची आई जणू एक दैवीशक्तीच. आमच्या वडिलांनी सर्व सत्ता उपभोगली. लोक हिताची काम केली.आईवडिलांच्या पुण्याईनं आम्ही आजही सुखानं एकत्र आहोत.सर्वांची काळजी घेणाऱ्या आईची माञ आम्हाला सेवा करता आली नसल्याची खंत विजयराव जामकर यांनी व्यक्त केली.आज तिच्या स्मरण गाथेच्या निमित्तान आठवणींला उजाळा मिळाला. सोहळ्याच्या निमित्ताने सोयऱ्यांचे दर्शन झाले हे फार मोठे समाधान आम्ही आज अनुभवले. जामकरांचे सुपुत्र असल्याचा आम्हा भावंडांना सार्थ अभिमान वाटतो असे मत विजयराव जामकर यांनी व्यक्त केले.
माणसाला बांधून ठेवणारी शक्ती आईचं असते.आईच्या प्रेमाची बरोबरी शक्यच नाही.आईची सेवा करत तिला सुख देणं ही आपली नैतिक जबाबदारीच आहे.याचं भान राखत प्रत्येकानं आईवडिलांची ची मनोभावे सेवा करावी.अस मनोगत विठ्ठलराव शेळके यांनी मांडत या सुंदर सोहळ्याचे कौतुक ही केले.मुलांच्या जडणघडणीत आईचं मोलाचं योगदान असत. ती शिक्षणासह संस्कार देत आपला सांभाळ करते. आईवडिलांच्या पुण्याईनं आम्ही भावंड एकसंघ आहोत. आम्हीच नव्हे तर जामकर साहेबांची चौथी पिढी ही या परंपरेला जपत वाटचाल करीत आहे. याचं सर्व श्रेय आमच्या आई कडे जाते.आज आईच्या निमित्तानं पुस्तक विमोचन सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित झालात ही आमची शिदोरी आम्ही समजतो. अशी भावना अध्यक्षीय समारोपात अँड.बाळासाहेब जामकर यांनी व्यक्त केली.यावेळी साक्षी शेळके,मनिषा राठोड,उध्दव पांचाळ,संतोष सावळे आदींनी कमलताई जामकर यांचे स्केच जामकर परिवाराला भेट दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संगीता आवचार यांनी केले तर डॉ .आशा गिरी यांनी आभार मानले.