प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे : परभणी.
सेलू : ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते याचे औचित्य साधून सेलू येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लि. शाखा सेलू चे शाखाधिकारी विश्वास देव यांनी सामाजिक जाणीव ठेवून एका छोटयाखांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गतका खेळाचे प्रशिक्षक पंकज सोनी, शुंन्भकरोती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निशिकांत पाटील हे उपस्थित होते. सुरुवातीला बँकेचे शाखाधिकारी विश्वास देव यांनी आपल्या प्रास्ताविकात बँक शहरातील सामाजिक,सांस्कृतिक कार्यामध्ये नेहमीच आपले योगदान देत आली आहे.बँकेने वेळोवेळी खातेदारांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.खातेदारांना आणी शहरातील नागरिकांना त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन कौतुक करण्याचे कार्यही केले आहे. त्याचाचं एक भाग म्हणून आज त्यांनी बँकेचे जेष्ठ खातेदार तथा नूतन कन्या प्रशालेच्या स्व.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाचे सेवा निवृत्त ग्रंथपाल डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी वाचन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक राज्यातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या कार्याचा जीवन गौरव म्हणून प्रमुख मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.गतका खेळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडेल मिळाल्याबद्धल श्रेया मनोज उपासे व सुरेखा मुळे या दोन खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन भास्कर गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे सर्व कर्मचारी,किरण धामणगावकर,पटणे आदीनी केले. कार्यक्रमाला बँकेचे खातेदार,महिला,विद्यार्थिनी उपस्थित होत्या.