प्रेस मीडिया लाईव्ह :
पनवेल : (प्रतिनिधी )
ओघवती रसाळ, मधाळ भाषा, नम्रता, स्मिताहस्य, प्रसन्न मुद्रा, प्रचंड आत्मविश्वास, परिपूर्ण पूर्वतयारी, अभ्यासू विवेचन, हजरजबाबीपणा प्रसंगावधान हे चांगल्या निवेदकाचे गुण आहेत. वारंवार चेहरावरून हात फिरवणे, हाताची घडी यातून आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो तर विषयानुरूप संदर्भासह, मुद्देसूद मांडणी सादरीकरण व अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण आपल्या निवेदनाच्या कार्यशाळेत प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे हे आसमंत वाईस अकॅडमीच्या संचालिका आणि आकाशवाणी निवेदिका पूर्णिमा शिंदे यांनी केले .
काही शाळेत महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकार्याने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर कळंबोली व अमरदीप बालविकास फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दोन तास चाललेल्या कार्यशाळेत अतिशय खुमासदार रंजकतेने सुसंवाद साधला. माईकचा वापर कसा करावा. अंतर किती. उभे राहणे हावभाव देहबोली शब्द फेक कसे करावे वाचन ,मनन, चिंतन ,अवलोकन पठन त्याचप्रमाणे अनावश्यक हालचाली कशा टाळाव्यात. आवाजातील लय ,नाद चढ-उतार , रोह अवरोह आवाजाची घ्यावयाची काळजी कोणकोणती व्यायाम करावे. याविषयीचे बहुमोल मार्गदर्शन पूर्णिमा शिंदे यांनी केले .तसेच सादरीकरणासाठी आवश्यक कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा हेही प्रशिक्षणातून सांगितले यामध्ये साधारण 40 शिक्षकांनी सहभाग नोंदवला. व त्यातून उत्साही, उत्स्फूर्त सहभाग प्रतिक्रिया दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे MLKSS व ABF चे संस्थापक एन.डी.खान यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली .कार्यक्रमाचे महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थाचे संस्थापक एन.डी.खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक श्रीम.सुनिता थोरात तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीम. स्वाती पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास श्री. राजकुमार ताकमोगे सौ मीना ताकमोगे , अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या सचिव सौ. सलमा खान तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञानमंदिरच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संजना बाईत ,पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ प्रियांका फडके,आणि श्रीम वर्षा पाचभाई इत्यादी मान्यवर तदप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.